Swargate Rape Case: दोन वेळा बलात्कार आणि मारहाण, आरोपी गाडेच्या अडचणी आणखी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 01:19 IST2025-03-13T01:17:24+5:302025-03-13T01:19:43+5:30

स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरण: दिशाभूल करत शिवशाही बसमध्ये नेऊन एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आणखी कलमे वाढवली आहेत. 

Three more sections have been filed against Swargate rape case accused Datta Gade, including two counts of rape | Swargate Rape Case: दोन वेळा बलात्कार आणि मारहाण, आरोपी गाडेच्या अडचणी आणखी वाढल्या

Swargate Rape Case: दोन वेळा बलात्कार आणि मारहाण, आरोपी गाडेच्या अडचणी आणखी वाढल्या

Swargate Rape News: पुण्यातील स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात आणखी कलमे वाढवली आहेत. आणिख तीन कलमे त्याच्याविरोधात लावण्यात आली असून, यात पीडित तरुणीचा रस्ता आडवणे, तिला मारहाण करणे आणि तिच्यावर दोन वेळा बलात्कार अशा गंभीर कलमांचा समावेश आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून पीडित तरुणीला शिवशाही बसमध्ये नेले होते आणि अत्याचार केला. 

पोलिसांनी आणखी तीन कलमे वाढवली 

कोठडीत असलेल्या आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याच्यावर आणखी तीन कलमांची वाढवली आहेत. पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने २ वेळा संभोग करणे, अशा गंभीर स्वरूपाची कलमे लावण्यात आली आहेत. 

भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 115(2) आणि 127(2) ही कलमे लावण्यात आली आहेत. पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे जप्त करून क्राइम लॅबकडे पाठवले आहेत. 

बुधवारी (१२ मार्च) न्यायालयाने आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. दत्ता गाडे याला २८ फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यात असलेल्या गुनाट गावातून अटक करण्यात आली होती. 

पोलिसांना चकमा देत आरोपी दोन दिवस ठिकाणे बदलत होता. अखेर एका उसाच्या शेतातून त्याला शिताफीने पकडण्यात आले होते. आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही सांगितले गेले.

Web Title: Three more sections have been filed against Swargate rape case accused Datta Gade, including two counts of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.