बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 08:42 IST2025-08-17T08:41:57+5:302025-08-17T08:42:31+5:30
ऑप्टिक फायबरचे काम करण्यासाठी गेले होते कामगार

बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (पुणे): बीएसएनएलच्या ऑप्टिक फायबर लाईन दुरुस्त करत असताना चेंबरमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला. प्राणघातक वायूमुळे श्वास कोंडल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
लखन उर्फ संदीप असरूबा धावरे (३५, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ गाव धाराशिव), साहेबराव संभाजी गिरशेटे (३५, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ गाव महाराज घोडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर), दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे (३५, रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ गाव तुळजापूर, जि. धाराशिव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणात बीएसएनएल ऑप्टिक फायबरचे १० बाय १० फूट आकाराचे चौकोनी डक्ट असून, यामध्ये ऑप्टिक फायबरचे काम करण्यासाठी शुक्रवारी दुपारी चार कामगार गेले होते.
नदीतून फुटबॉल काढताना दोन बालकांचा बुडून मृत्यू
सिंदेवाही (चंद्रपूर) : बोकडडोह नदीकाठावर फुटबॉल खेळताना हा बॉल नदीत गेल्याने काढण्यासाठी धावलेल्या दोन बालकांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १६) दुपारी १ वाजता घडली. जीत टीकाराम वाकडे (१५) आणि आयुष दीपक गोपाले (१६ रा. सिंदेवाही) अशी मृतकांची नावे आहेत.
काही विद्यार्थी सर्वोदय महाविद्यालयाच्या ग्राउंडवर फुटबॉल मॅच खेळत होते. मॅच संपल्यानंतर सर्व मुले घरी निघून गेले. मात्र, काही मुले पुन्हा मॅच खेळण्यासाठी टेकरीला जात असल्याची माहिती घरच्यांना दिली आणि घरून मॅच खेळण्याकरिता निघून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, दहा ते बारा मुले टेकरी येथील बोकडडोह नदीकाठी मॅच खेळत असताना फुटबॉल हा नदीच्या पाण्यात गेला होता.