वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 11:05 AM2020-04-09T11:05:55+5:302020-04-09T11:08:23+5:30

किराणा दुकानांना व होम डिलिव्हरी भाजीपाला फक्त दोन तास उघडे ठेवण्याची मुभा.

Three-day lockdown in the villages within the limits of Walchandnagar Police Station | वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन 

वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन 

Next
ठळक मुद्देअत्यंत निकडीच्या गोष्टी व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रशासन तत्परप्रशासनाला सर्व नागरिकांची मदत आणि सहकार्य आवश्यक

कळस : बारामतीमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्याने वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. 
तहसिलदार, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संपुर्ण लॉकडाऊन कालावधीत दवाखाने व मेडिकल वगळता कोणत्याही स्वरूपाची दुकाने चालु राहणार नाहीत. किराणा दुकानांना व होम डिलिव्हरी भाजीपाला फक्त दोन तास उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली नाही. या कालावधीत नागरिकांनी घरातच थांबुन प्रशासनला सहकार्य करायचे आहे. शेजारील बारामतीमध्ये रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुक्यामध्ये कोरोनाला प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्धार करण्यात आला आहे. 
  प्रशासनाला सर्व नागरिकांची मदत आणि सहकार्य आवश्यक आहे. आपण प्रशासनाला साथ द्यावी आणि घराबाहेर पडू नये. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आपल्या अत्यंत निकडीच्या गोष्टी व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रशासन तत्पर असून कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

Web Title: Three-day lockdown in the villages within the limits of Walchandnagar Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.