मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ; सुमारे २ लाख अर्ज अपात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:24 IST2024-12-18T15:24:29+5:302024-12-18T15:24:49+5:30
जिल्हानिहाय लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ हजार ९८७ जणांना मिळाला आहे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा साडेतीन लाख ज्येष्ठांना लाभ; सुमारे २ लाख अर्ज अपात्र
पुणे : ज्येष्ठ नागरिकांना एकरकमी ३ हजार रुपये बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेत आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख जणांना लाभ मिळाला आहे. लाभार्थ्यांमध्ये पुणे आणि नागपूर विभागातील ज्येष्ठांचा सहभाग सर्वाधिक आहे. या योजनेत आतापर्यंत १८ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यातील १३ लाखांपेक्षा जास्त अर्जांना मंजुरी मिळाली आहे. सुमारे २ लाख अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हानिहाय लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ हजार ९८७ जणांना मिळाला आहे.
२ लाख अर्ज अपात्र
राज्यात आतापर्यंत १८ लाख ७३ हजार ६९४ अर्ज आले आहेत. त्यातील १३ लाख ६७ हजार ३७५ अर्जांना मान्यता देण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली, तर लाख ५ हजार ७०२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हा व महापालिकास्तरीय समित्यांकडे ३ लाख ६१७ अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. ११ लाख ९२ हजार ७५८ अर्जांची माहिती पोर्टलवर टाकण्यात आली आहे. आधार जोडणीचे काम झाल्यानंतर अर्जदारांना लाभ देण्यात येत आहे.
सर्वाधिक लाभार्थी पुणे विभागात
लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक ६९ हजार ८६६ जण पुणे विभागातील आहेत. त्याखालोखाल ६९ हजार ८६१ लाभार्थी नागपूर विभागातील आहेत. मुंबई विभागातून ३५ हजार ५१०, नाशिक ४३ हजार ९१२, अमरावती ५३ हजार ६१, संभाजीनगर ३२ हजार ८०१, तर लातूर विभागातून ४२ हजार ५९९ जणांना लाभ मिळाला आहे.
जिल्हा लाभार्थी
मुंबई शहर : २३४
मुंबई उपनगर : १,२०८
ठाणे : ३,९९२
पालघर : २,६८५
रायगड : ८,३५३
रत्नागिरी : ६,९९१
सिंधुदुर्ग : १२,०४७
नाशिक : ७,६०६
धुळे : ५६०६
नंदुरबार : ४,४३१
जळगाव : १२,९२६
अहिल्यानगर : १३,३४३
पुणे : १०,२८३
सांगली : ६,४६७
सातारा : ११,२६२
सोलापूर : ५,८७६
कोल्हापूर : ३५,९८७
अमरावती : ११,९८१
बुलढाणा : १३,००४
अकोला : ११,१९३
वाशिम : ५,४५२
यवतमाळ : ११,४३१
नागपूर : ११,३४३
वर्धा : ७,९०४
भंडारा : १२,६३४
गोंंदिया : १३,२९१
चंद्रपूर : ११,६३२
गडचिरोली : १३,०५७
संभाजीनगर : ४,७३०
बीड : ११,३३३
परभणी : १२,६२४
लातूर : १२,९०४
नांदेड : १०,८२४
धाराशिव : ११,८३५
एकूण : ३,४७,६१०