तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीनं उकळले 'साडेपाच' लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:09 PM2021-09-16T14:09:18+5:302021-09-16T14:09:25+5:30

तरुणाच्या नग्न कॉलचा स्किन रेकॉर्ड करुन तो व्हायरल करण्याची धमकी दिली

Threatening to make a nude video of a young man viral, the young woman boiled 'five and a half' lakhs | तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीनं उकळले 'साडेपाच' लाख

तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीनं उकळले 'साडेपाच' लाख

Next
ठळक मुद्देवेळोवेळी तरुणाकडून दोन बँक खात्यात ५ लाख ५४ हजार १०० रुपये खंडणी स्वरुपात पाठविण्यास सांगितलं

पुणे : फेसबुक अकाऊंटवर झालेल्या मैत्रीनंतर नग्न अवस्थेतील व्हिडिओ कॉलचा स्किन रेकॉडिग करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीनं तरुणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी धानोरीत राहणाऱ्या एका ३५ वर्षाच्या तरुणानं विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ मे २०२१ मध्ये घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिनत शर्मा असं नाव धारक करणाऱ्या तरुणीनं फिर्यादीबरोबर फेसबुक अकाऊंटवरुन मैत्री केली. तिनं फेसबुक मेसेजरवर व्हिडिओ कॉल केला. त्यावर ती नग्न अवस्थेत होती. तिनं फिर्यादी यांनाही तसं करण्यास सांगितलं. तिच्या सांगण्याप्रमाणं त्यानं कृती केल्यावर तिने हा व्हिडिओ कॉलचा स्किन रेकॉर्ड करुन ठेवला. त्यानंतर फिर्यादीला तो व्हायरल करण्याची धमकी दिली.

तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी वेळोवेळी फिर्यादीकडून दोन बँक खात्यात ५ लाख ५४ हजार १०० रुपये खंडणी स्वरुपात पाठविण्यास सांगितलं. साडेपाच लाख रुपये दिल्यानंतरही तिची मागणी न थांबल्याने शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Threatening to make a nude video of a young man viral, the young woman boiled 'five and a half' lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app