शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 10:10 IST

सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल

पुणे : पर्वती येथील जागेबाबत त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋषीकेश बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटक पूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच यात मध्यस्थी करणारा अ‍ॅड. उमेश शेंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ कोटी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस अटक केली होती.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अ‍ॅड. उमेश चंद्रशेखर मोरे (रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची तक्रार दिली होती. त्यानुसार अ‍ॅड. शेंडे याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपी ऋषीकेश बारटक्के यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीबाबत चौकशी केली. ही जागा सध्या आमच्या ताब्यात आहे. या जागेचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेल्याने ऋषीकेश बारटक्के व शहा यांना राग आला होता. २७ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजता ते सेंट्रल बिल्डिंग येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात आले होते. तेथून परत जात असताना मोरे यांना बारटक्के याने रस्त्यात अडवून तक्रार का दिली असे विचारुन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. या प्रकारे मोरे हे घाबरुन गेले होते.

त्यांनी भितीपोटी २ जानेवारी रोजी बंडगार्डन पोलिसांकडे अर्धवट तक्रार केली होती. या अर्जाची तपासणी केल्यानंतर बुधवारी बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे