गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 06:17 IST2023-02-14T06:16:48+5:302023-02-14T06:17:03+5:30
धमकी देणाऱ्यास हैदराबादहून घेतले ताब्यात

गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / पुणे : पुण्यातील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने संपूर्ण कार्यालयाची व परिसराची तपासणी केली. मुंबई पोलिसांच्या पथकाने फोन करणाऱ्यास हैदराबाद येथून अटक केली आहे.
पुण्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या भावानेच हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. पनयम बाबू शिवानंद असे त्याचे नाव असून, दारूच्या नशेत फोन केल्याची कबुली त्याने दिली आहे. मुंबईतील बीकेसीतील गुगलच्या कार्यालयात रविवारी रात्री ८ वाजता पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बाॅम्ब ठेवल्याचा फोन आला. पनयम याचा भाऊ पुण्यातील कंपनीत काम करतो. त्याच्या कंपनीचे नाव व गुगल कंपनीचे नाव त्याला सारखेच वाटले.