शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सहायक आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयूर कॉलनी दरम्यान अतिक्रमण कारवाई करत असताना त्याला आडकाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयूर कॉलनी दरम्यान अतिक्रमण कारवाई करत असताना त्याला आडकाठी आणून महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जावेद शेख, हसीना शेख व चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रकाश धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयूर कॉलनी दरम्यान रस्त्याचे मध्ये येणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई बुधवारी दुपारी करण्यात येत होती. यावेळी आरोपींनी आमचे घर रस्तारुंदीकरणामध्ये बाधित होत नाही, तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, तुम्ही आम्हाला मोबदला दिला नाही, तुम्ही घर कसे पाडता बघून घेतो, आम्ही मेलाे तरी चालेल, परंतु तुम्हाला कामच करू देत नाही असे म्हणून त्यांनी त्याचे वृद्ध आईवडिलांना रिकाम्या करावयाच्या खोलीमध्ये बसवून आता तुम्ही कारवाई करा व त्यांना काही बरे-वाईट झाले तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांनी एसआरएच्या अतिरिक्त आयुक्तांसमोर सहायक आयुक्त संदीप कदम यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तुम्ही सायंकाळी एकटे असता तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी दिली. पोलिसांनी बेकादेशीर जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.