हजारो काँग्रेस कार्यकर्ते घालणार विधानसभेला घेराव; राज्यभरातून नागपूरला जमा होणार
By राजू इनामदार | Updated: December 6, 2023 18:35 IST2023-12-06T18:34:16+5:302023-12-06T18:35:51+5:30
संपूर्ण राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, महाराष्ट्रात रोजगाराच्या आणि उच्च शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा अनेक मागण्या

हजारो काँग्रेस कार्यकर्ते घालणार विधानसभेला घेराव; राज्यभरातून नागपूरला जमा होणार
पुणे: युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते ८ डिसेंबरला विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात विधानसभेला घेराव घालणार आहेत. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशानुसार या आंदोलनासाठी राज्यभरातून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूरला जमा होणार आहेत.
संपूर्ण राज्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, महाराष्ट्रात रोजगाराच्या आणि उच्च शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध करून द्याव्यात, पेपर फुटीमध्ये दोषींवर कारवाई करावी, कमी विजदर, कापूस-सोयाबीन आणि धान पिकांना रास्त भाव, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची भरीव मदत, लवकरात लवकर शिक्षक भरती, अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे राज्याची कोलमडलेली अर्थव्यवस्था सुरळीत करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी हा घेराव घालण्यात येणार आहे असे राऊत यांनी सांगितले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानु, सहप्रभारी ऐहसान खान, रोहित कुमार, मीडिया विभागाचे चेअरमन अक्षय जैन, सरचिटणीस श्रीनिवास नालमवार, राज्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत असे राऊत म्हणाले.