देश ताेडण्याची भाषा करणाऱ्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे : शहनवाझ हुसेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 20:32 IST2019-04-06T20:29:37+5:302019-04-06T20:32:38+5:30
भारतीय जनता पार्टी विराेधकांना देशद्राेही म्हणत नाही परंतु जे देश ताेडण्याची भाषा करतात त्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी विराेधकांवर हल्ला चढवला.

देश ताेडण्याची भाषा करणाऱ्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे : शहनवाझ हुसेन
पुणे : भारतीय जनता पार्टी विराेधकांना देशद्राेही म्हणत नाही परंतु जे देश ताेडण्याची भाषा करतात त्यांना देशद्राेहीच म्हंटले पाहिजे असे म्हणत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी विराेधकांवर हल्ला चढवला. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे भाजपाचे उमेदवार गिरीश बापट, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, खासदार अनिल शिराेळे, महापाैर मुक्ता टिळक आदी यावेळी उपस्थित हाेते. माेदींच्या राज्यात मुस्लिम सुरक्षित असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
हुसेन यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर बाेलत विराेधकांवर हल्ला चढवला. हुसेन म्हणाले, माेदींवर सगळेच प्रेम करतात. राहुल गांधींना देखील बाेलावं लागलं की ते माेदींवर प्रेम करतात. गांधी जे बाेलतात ते करत नाहीत. संसदेत माेदींची गळाभेट घेतात आणि नंतर डाेळा मारतात. आणि बाहेर माेदींचा द्वेष करतात. काल राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या सभेत माेदींनी अडवाणी यांना स्टेजवरुन खाली उतरवले अशी टीका केली हाेती. त्यावर बाेलताना हुसेन म्हणाले, गांधी भाषेची मर्यादा ताेडत आहेत. टीका करताना आम्ही कधी भाषेची मर्यादा साेडली नाही. गांधी यांनी टीका करताना जी भाषा वापरली त्याचा आम्ही निषेध करताे. त्यांनी देशाची माफी मागायला हवी. गांधी कधी भारतीय सेनेचा अपमान करतात तर कधी ज्येष्ठांचा अनादर करतात. अमित शहा यांच्या अर्जात कुठलिही त्रुटी नाही. काॅंग्रेसला सगळीकडे खाेटं दिसतं. त्यांनी आपली नजर बदलावी. त्यांनी केलेल्या आराेपात कुठलेही तथ्य नाही.