शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ २५ गुंडांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 9, 2015 05:22 IST

पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर केलेल्या सशस्त्र हल्लाप्रकरणी २५ जणांवर बेकायदेशीर जमाव आणि तोडफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाटस : पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर केलेल्या सशस्त्र हल्लाप्रकरणी २५ जणांवर बेकायदेशीर जमाव आणि तोडफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, एक चारचाकी गाडी (एमएच १२-टीएफ ९९९९) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे़रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ५० जणांनी पाटस नाक्यावर सशस्त्र हैदोस घातला होता. यात दोन कर्मचारी जखमी झाले होते. तसेच, टोलनाक्यावर दगडफेक करण्यात आली होती़ या घटनेत टोलनाक्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे टोलनाका व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.पाटस टोलनाक्याचे सुपरवायझर किरण नवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रविवारी ४ च्या सुमारास बुथ नं. १२ मध्ये अनिल भंडलकर आणि आदिनाथ ढवळे हे दोन कामगार आपले कामकाज करीत होते. त्या वेळी एक चारचाकी वाहन आले. चालक आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात टोल देण्या-घेण्यावरून वाद झाला. या वेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन चालकाला सोडून दिले. सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला हॉकी स्टिक घेऊन टोलनाक्यावर आले आणि बूथ नंबर १२ मधील अजिनाथ या कर्मचाऱ्याला खिडकीतून बाहेर ओढले. या वेळी त्याने आरडाओरडा केल्यामुळे तो बचावला. साडेपाच ते रात्री साडेआठदरम्यान वाहनांचा टोल घेणे बंद ठेवले होते. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पवार, संतोष मदने अधिक तपास करीत आहेत. आणि वाहन पकडले पाटस टोलनाक्यावर हाणामारी झाल्यानंतर काही वाहने पळून गेली. दरम्यान या घटनेची यवत पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी नाकेबंदी केली होती. चारचाकी गाडी (एमएच १२ टी-एफ ९९९९) कासुर्डी टोलनाक्यावर अडविल्यानंतर त्यातील चालकासह अन्य काही व्यक्ती पळून गेल्या़ त्यानंतर ही गाडी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती यवतचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.