Maharashtra Temperature: यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; महाराष्ट्रालाही झळा बसणार

By श्रीकिशन काळे | Updated: March 1, 2025 20:21 IST2025-03-01T20:20:59+5:302025-03-01T20:21:42+5:30

महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

This summer will be more hot Maharashtra will also suffer | Maharashtra Temperature: यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; महाराष्ट्रालाही झळा बसणार

Maharashtra Temperature: यंदाचा उन्हाळा जास्तच ‘ताप’दायक ठरणार; महाराष्ट्रालाही झळा बसणार

पुणे: यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार आहे. महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मार्च महिन्यामध्ये तापमान वाढत जाईल, असे हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोल्यात ३८.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. डी. एस. पै यांनी मार्च ते मे दरम्यानच्या उन्हाळ्याविषयी माहिती प्रसिद्ध केली. खरंतर फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याचा ‘फिल’ येऊ लागला होता. सकाळी आणि रात्री कमी तापमान, तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदा फेब्रुवारी महिना पहिल्या क्रमांकावर होता. यंदा देशात फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक किमान तापमान १५.२, तर यापूर्वी २०१६ मध्ये सर्वाधिक १४.९१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. यंदा मार्च महिन्यामध्ये सरासरी किमान तापमान हे अधिक राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. मार्च महिन्याच्या १ तारखेलाच तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

या राज्यांना तीव्र झळा !

देशातील महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या उत्तर भागात उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यंदा तापमान तापदायक ठरणार आहे. पावसाचा अंदाज नाही, पण महाराष्ट्रात आणि काही राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा येतील. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. --डॉ. अनुपम कश्यपी, माजी संचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

राज्यातील कमाल व किमान तापमान

पुणे : ३६.२ : १७.९
नगर : ३५.२ : १६.४
महाबळेश्वर : ३१.४ : १८.२
सांगली : ३६.३ : २२.०
सोलापूर : ३७.६ : २२.८
मुंबई : ३०.८ : २४.७
छ. संभाजीनगर : ३५.२ : १९.५
बीड : ३६.० : २३.४
वर्धा : ३७.० : २०.२
अकोला : ३८.५ : १९.८

Web Title: This summer will be more hot Maharashtra will also suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.