शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शेतकरी उभारणार ‘तिसरा पर्याय’; पुण्यात राष्ट्रीय किसान परिषद, १४ राज्यांतील प्रतिनिधी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:53 AM

शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. 

ठळक मुद्देहुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रीय किसान परिषद२६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची करण्यात येणार आखणी

पुणे : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने काही केले नाही. या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. देशात शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही. शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. हुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेने राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला देशभरातील चौदा राज्यांमधील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या परिषदेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांना घातक असलेली धोरणं बदलायला तयार नाही. त्यामुळे जनतेला एकत्र करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तिसऱ्या पर्यायाचा विचार पुढे आला आहे. जनआंदोलन उभे करुन जनमत एकत्र करावे लागणार आहे. देशपातळीवर २६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची आखणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्याला व्यथित करुन देशात बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी असा विकास केला जात आहे. मात्र, विकासाच्या खोट्या स्वप्नांव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडत नाही. भाजपा, काँग्रेस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी शेती आणि शेतकऱ्याला ओझे समजूनच आजवरची वाटचाल केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जनता शहरात जाऊन मोलमजुरी करते. देशातील ८0 टक्के जनतेला गुलाम ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत का असा प्रश्नही करण्यात आला. शेतकऱ्यांनी संघटित होणे, संघर्ष करणे अपरिहार्य झाले असून त्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही राजकीय पक्षाकडून आशा राहिलेल्या नाहीत. शेतकऱ्यांचे हिन दिन असे रंगवले जाणारे चित्र बदलले पाहिजे. आम्हाला या राजकीय पक्षांपेक्षाही नेमका पर्याय द्या अशी मागणीही संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. शेतकऱ्यांनी मुलांना अत्याधुनिक शिक्षणासोबतच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकविल्यास शेतीचे चित्र पालटेल असा विश्वास व्यक्त झाला. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आमदार-खासदार बड्या उद्योजकांच्या आणि भांडवलदारांच्या मांडीला मांडी लावून बसतात. तेच शेतकऱ्यांचे नुकसान करतात. जेव्हा ते गावाकडे परत येतात तेव्हा हाच शेतकरी त्यांचे हार तुरे घालून सत्कार करतो. त्यांना हारतुरे घालणे बंद करुन थेट जाब विचारण्याची आवश्यकता आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय केले याचा जाहीर जाब विचारुन नेमक्या कोणत्या योजना आणल्या याचे स्पष्टीकरण मागा असे मत हरियाणाहून आलेले समशेरसिंग दहिया यांनी व्यक्त केले.आजच्या सत्रांमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील,  ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखोले, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, किशोर ढमाले, गणेश जगताप, समशेरसिंग दहिया, योगेश दहिया, सतनामसिंग बेरु,चेगल रेड्डी, आर. व्हि. गिरी, शांताकुमार, लिलाधर राजपूत, कन्हैलाल सिहाग आणि दशरथ रेड्डी यांच्यासह विविध राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे