शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘लमाण’ च्या न झालेल्या अनुवादाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 06:00 IST

अनेक प्रतिभावान अभिनेत्यांना त्याचे आकर्षण

ठळक मुद्देनसिरुद्दीनसह अनेकांची इच्छा : प्रकाशकांना प्रस्तावाची प्रतीक्षा

राजू इनामदारपुणे: ‘लमाण’ हे प्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र. आपल्या अभिनयाचा सुरवातीपासूनचा प्रवासच त्यांनी यात उलगडून दाखवला आहे. अनेक प्रतिभावान अभिनेत्यांना त्याचे आकर्षण आहे. तन्वीर पुरस्कार स्विकारताना झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये नसिरुद्दीन शहा यांनी ‘बहुदा त्याचा अनुवाद होत आहे’ असे सांगितले. त्याचा शोध घेतला असता मराठीतील ही उत्तम कलाकृती अनेकांच्या इच्छेनंतरही अजून अनुवादाच्या जवळ पोहचली नसल्याचे आढळले.‘पत्नी रत्ना हिने ‘लमाण’ या मराठीतील शब्दाचा अर्थ उलगडून दाखवल्यावर मी त्याच्या प्रेमातच पडलो. डॉ. लागू हे अभिनयश्रेष्ठ आहेत. त्यांनी ‘लमाण’ मध्ये काय लिहिले असेल याची उत्सुकता आहे, पण ते मराठीतून असल्यामुळे वाचता येत नाही. त्याचा बहुदा हिंदी व इंग्रजीत अनुवाद होत आहे’ असे शहा पुण्यातच झालेल्या तन्वीर पुरस्कार कार्यक्रमात म्हणाले. ‘कोण करत असेल अनुवाद?’ या उत्सुकतेपोटी त्याचा शोध घेतला. त्याची सुरूवात दीपा लागू यांच्यापासूनच झाली. त्यांनी ‘अहो, असे म्हणाले का नसिरुद्धीन शहा?’ म्हणून प्रतिप्रश्न केला. ‘आम्हाला माहिती नाही कोणी करत असेल तर, कोणी तशी विचारणाही आमच्याकडे केलेली नाही किंवा माहितीही दिलेली नाही’ असे त्या म्हणाल्या, मात्र ‘अनुवाद व्हायला हवा, कोणीतरी पुढे येऊन हे काम करायला हवे, श्रीरामने त्याच्या आयुष्यातील घटनांबद्दल सांगतानाच अभिनयासंबधी ‘लमाण’ केलेले विवेचन उत्कृष्ट आहे, ते सर्वांसमोर यायला हवे’ असे मत त्यांनी व्यक्त केले. जाताजाता यासंबधी काही सुरू असेल तर पॉप्यूलर प्रकाशचे (लमाण चे प्रकाशक) रामदास भटकळ यासंबधी काही सांगू शकतील असेही त्यांनी सांगितले.भटकळांनाही याची माहिती नव्हती. ‘मी आता व्यवसायातून निवृत्त झालो आहे, लेखनकाम करत असतो. त्यामुळे काहीच माहिती नाही’ असे ते म्हणाले. ‘तुमचेच, तुम्ही स्वत: सर्व प्रक्रिया करून तयार केलेले पुस्तक आणि तुम्हालाच कसे माहिती नाही असे विचारून त्यांना बोलते केले तर म्हणाले, ‘‘त्यात डॉ. लागू यांनी अभिनयासंबधीचा त्यांचा जो काही अभ्यास मांडला आहे तो या क्षेत्रात काम करणाºयांना नक्कीच दिशादर्शक ठरेल. त्यासाठी तरी अनुवाद व्हायला हवा.’’ पॉप्युलर मध्ये असे काही सुरू असेल तर संपादक अस्मिता मोहिते याच काही सांगू शकतील असे म्हणत भटकळ यांनी आणखी एक वाट करून दिली. अस्मिता म्हणाल्या, ‘‘काही वर्षांपुर्वीच शहा व आणखी एकदोघांनी ‘लमाण’ चा अनुवाद आहे का अशी विचारणा केली होती. त्यावेळी नाही असे सांगतानाच अनुवाद व्हायला हवा असे ठरवले होते. काहीजणांना त्याबाबत विचारणाही केली, मात्र पुढे प्रतिसाद मिळाला नाही.’’----------------------

टॅग्स :PuneपुणेNaseeruddin Shahनसिरुद्दीन शाहShriram Lagooश्रीराम लागू