शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

चाेरट्यांनी थेट एटीएमच नेले चाेरुन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 7:11 PM

चाकणमध्ये चाेरट्यांनी एटीएम मशीनच चाेरुन नेल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे.

चाकण :  खराबवाडी (ता. खेड) येथील तळेगाव चाकण महामार्गालगतच्या सारा सिटी शेजारील साई निवास बिल्डिंगमधील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममधील तब्बल ९ लाख ७२ हजार ३०० रुपये एटीएम मशिनसह चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी (दि.१५) सकाळी उघडकीस आली.  

सूरज दत्तात्रय काचळे (वय २८, रा. सारा सिटी, खराबवाडी, चाकण) यांनी या प्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील खराबवाडी औद्योगिक वसाहतीतील सारा सिटीच्या गेटशेजारील साई निवास बिल्डिंगमध्ये अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी नेहमीच पैसे काढण्यासाठी लोकांची वर्दळ असते, त्यामुळे या एटीएम मशिनमध्ये लाखो रुपयांची रक्कम भरलेली असते.

रविवारी रात्री १.३० ते २ च्या दरम्यान चोरट्यांनी विकानेर कंपनीचे अ‍ॅक्सिस बँकेचे संपूर्ण एटीएम मशिन कापून रोकडसह पांढऱ्या रंगाच्या मोटारीत गाडीतून चोरून नेले. या मशिनमध्ये १०० रुपयांच्या ३ नोटा, २०० रुपयांच्या ७४० नोटा,  तर ५०० रुपयांच्या १६४८ असे ९ लाख ७२ हजार ३०० रुपये रोख तर ३ लाख ५० हजार रुपयांचे मशिन असा १३ लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.

एटीम मशिनची सुरक्षा रामभरोसेचाकण व परिसरात विविध बँकेचे शेकडो आसपास एटीएम मशिन आहेत. बहुतांश एटीएम मशिन सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नाहीत. फक्त सीसीटीव्हीच्या भरवशावरच जनतेचे लाखो रुपये ठेवले जातात. याबाबत संबंधित बँक किती जागरूक आहे, हे दिसून येते. एटीएम मशिनच्या सुरक्षेसाठी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी मागील महिन्यात सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तशा सूचना केल्या होत्या. मात्र, बँकेकडून अजूनही सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, हे आजच्या चोरीवरून उघड झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणatmएटीएमtheftचोरी