चोरट्याने पीएमपी बस प्रवासात केले दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:49 IST2018-06-01T15:49:25+5:302018-06-01T15:49:25+5:30
विवाहितेच्या पर्स मधील तब्बल लाख रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार घडला.

चोरट्याने पीएमपी बस प्रवासात केले दागिने लंपास
पिंपरी-चिंचवड (वाकड) : पीएमपी बसने थेरगाव मधील लक्ष्मण नगर येथून पुणे स्टेशनच्या प्रवासादरम्यान विवाहितेच्या पर्स मधील तब्बल लाख रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी रेखा बळीराम खांडेकर (वय २७, रा. मातोश्री कॉलनी गुजर नगर थेरगाव) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी व त्यांचे पती काही कामानिमित्त पीएमपी बसने पुण्याला जात होते ते लक्ष्मण नगर थेरगाव येथून पीएमपीमध्ये बसले ते काळेवाडी फाट्यापर्यंत गेले असता फिर्यादी यांच्या खांद्यावर असलेल्या पर्सची चैन उघडून आतील लहान पाकीट व त्यातील लाख रुपयांचे दागिने चोरट्याने पळविले. वाकड पोलीस तपास करत आहे.