शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वासुंदे गावात दिवसाढवळ्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:52 IST

शेतकऱ्याच्या घरात दिवसाढवळ्या झाली चोरी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास

वासुंदे - वासुंदे (ता दौंड) येथील गावठाणात असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे २ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास घडली असून याबाबतचा गुन्हा दौंड पोलीस स्टेशनला दाखल झाला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुंदे गावठाणात राहणारे अशोक भगवान बागल व त्यांच्या पत्नी उषा अशोक बागल हे पती-पत्नी घरातील काम उरकून दुपारी बारा वाजताचे सुमारास शेतातील काम करण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील काम उरकल्यानंतर सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान घरी आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाट व शोकेस उघडे दिसून आले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व त्यातील रोख रक्कम रुपये २५ हजार व ४ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.वासुंदे गावठाणातील वर्दळीच्या ठिकाणी ही दिवसा चोरी झाल्याने या परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा झालेली ही चोरी पाळत राखून झाली असल्याची चर्चा स्थानिक नागरिक करत आहेत.दरम्यान, अशोक बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दौड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटय़ा विरुद्ध गु.र.नं 884/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305,331(3) नुसार गुन्हा दाखल झाला असून दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन शिंदे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी