चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 22:02 IST2021-07-16T22:01:55+5:302021-07-16T22:02:27+5:30
दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना रानमळा (ता. खेड ) येथे घडली आहे.

चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली
राजगुरूनगर: चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना रानमळा (ता. खेड ) येथे दि. १६ रोजी दुपारी घडली आहे. याबाबत नितीन बाळासाहेब गायकवाड (वय ४७ ) रा कुरूळी (ता, खेड ) यांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गायकवाड यांनी दोन लाख रुपये बॅकेतुन काढून त्यांच्या गाडीत ठेवली होती. ते चारचाकी घेऊन रानमळा कडुस (ता खेड ) येथे गेले होते. चारचाकी पार्क करून प्लॉटवर गेले असता, दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन गाडीच्या डाव्या बाजूच्या मागील व पुढील काचा फोडून गाडीत ठेवलेल्या लॅपटॉप बॅगमधील रोख दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबविले. तसेच चोरट्यांनी महत्वाची कागदपत्रे चोरून नेली. मात्र कागदपत्रे चोरट्यांनी घटनास्थळापासुन काही अंतरावर ती टाकून दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस हावलदार नवनाथ थिटे करित आहे.