शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात गेलेले कंटाळून परतले

By admin | Updated: January 25, 2017 02:31 IST

आमच्यातून जे गेले ते गेले, त्यांचा विचार करीत नाही; मात्र जे गेले त्यांच्यातील अनेकांचा तिथला अनुभव चांगला नाही. त्यातील काही

पुणे : आमच्यातून जे गेले ते गेले, त्यांचा विचार करीत नाही; मात्र जे गेले त्यांच्यातील अनेकांचा तिथला अनुभव चांगला नाही. त्यातील काही परतही येऊ लागले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीवर थेट नाव न घेता टीका केली. समविचारी पक्षांना बरोबर घेण्याची पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सूचना आहे, त्याप्रमाणे काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची बोलणी सुरू आहेत, असे ते म्हणाले.जंगली महाराज रस्त्यावर पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी वॉर रूम सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद््घाटन पवार यांच्या हस्ते झाले. काँग्रेसचे नगरसेवक, माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना काकडे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, तसेच अन्य पदाधिकारी, नगरसेवक, इच्छुक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.भाजपात गेलेल्या विनायक तांबे यांना या वेळी पक्षात प्रवेश देण्यात आला. त्याचा उल्लेख करून पवार म्हणाले, ‘‘तिथे गेलेले आता भेटून सांगतात की राष्ट्रवादीमध्ये एका कुटुंबासारखे वाटत होते. तिथे आम्हाला वेगळे वागवतात. परत पक्षात यायचे आहे. जाणारे आमच्याकडे आले तेव्हा कोणीही नव्हते. पक्षाने त्यांना पद दिले, प्रतिष्ठा दिली. आता त्यांना नको वाटत असेल तर आग्रह नाही.’’ मोहिनी देवकर यांना उमेदवारी देणार याची खात्री हवी होती, ती देता येत नव्हती, त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले, असे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)