शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यावर म्हशींना घेऊन गेले अन् परतलेच नाहीत; शेतकऱ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 17:54 IST

दोन दिवसांनी शेतकऱ्याचा मृतदेह बंधाऱ्याजवळ आढळून आला

नसरापूर : कुरंगवडी (ता.भोर) येथील शेतकरी गोठ्यातील जनावरांना पाणी पाजण्यासाठी बंधाऱ्यावर घेऊन गेला असताना पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना येथे नुकतीच घडली. राजगड पोलिस ठाण्यात माहीती दिल्यावर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे. शंकर विठोबा कचरे (वय ५४ वर्षे रा.कुरंगवडी ता.भोर) यांचा या शेतकऱ्याचा दुर्दैवी घटनेत पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे. याबाबत पोलिस पाटील नरेश शिळीमकर यांनी राजगड पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. 

गेल्या मंगळवारी ( दि.१६) रोजी शेतकरी शंकर कचरे हे नेहमी प्रमाणे दुपारी त्यांच्या गोठ्यातील दहा ते बारा म्हशी घेऊन सांगवी-घोरेपडळ गावा जवळील गुंजवणी नदीच्या बंधाऱ्यावर घेऊन गेले होते. त्यानंतर संध्याकाळी या म्हशी घरी परत गेल्या, परंतु त्यांचे सोबत गेलेले कचरे पुन्हा घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी कचरे यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र कचरे सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी पुन्हा घरातील सर्व जण कचरे यांच्या शोधासाठी पुन्हा घरा बाहेर पडले. तेंव्हा त्यांना सांगवी-घोरेपडळ येथील बंधाऱ्या लगत कचरे यांचे कपडे व चप्पल मिळून आली. त्यावेळी त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यातील पाण्यातही शोध घेतला असता त्यात शंकर कचरे असता त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत अनिल शंकर कचरे (वय २७ वर्षे) यांनी नसरापूर येथील राजगड पोलिस ठाण्यात खबर दिली असुन पुढील तपास पोलिस हवालदार गणेश कुदळे करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSocialसामाजिकDeathमृत्यूWaterपाणी