पुण्यात ब्युटी पार्लरवर हात साफ करत महिलांचे कपडेही चोरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 18:35 IST2022-07-30T18:32:48+5:302022-07-30T18:35:25+5:30

गोल्डन ओर्चीड सोसायटीमध्ये ब्युटी पार्लरमध्ये प्रकार...

They also stole women's clothes theft in beauty parlour pune crime news | पुण्यात ब्युटी पार्लरवर हात साफ करत महिलांचे कपडेही चोरले

पुण्यात ब्युटी पार्लरवर हात साफ करत महिलांचे कपडेही चोरले

पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी ब्युटी पार्लरमधील साहित्य तसेच लेडीज कापड दुकानातून महिलांचे कपडे चोरून नेले. एकूण १ लाख ८७ हजारांचे मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना गुरुवारी (दि. २८) रात्री साडेआठ ते शुक्रवारी (दि. २९) सकाळी साडेनऊ या कालावधीत चिखली येथील लोटस बी ऑन सलून ॲण्ड इन्स्टिट्यूट आणि तळमजल्यावरील लेडीज दुकान येथे घडली.

रोहित रमेश सोरटे (वय ४७, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चिखली-जाधववाडी रस्त्यावर गोल्डन ओर्चीड सोसायटीमध्ये ब्युटी पार्लर आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्री दुकानाचे गेट व दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून रोख रक्कम, ब्युटी पार्लर साठी लागणारे साहित्य चोरले.

शाहदत्त खुर्शीद आलम अन्सारी यांच्या लेडीज कपड्याच्या दुकानाचे प्लायवूड कशाने तरी काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातून ब्लाउज, पिकोफॉल करण्यासाठी दुकानात असलेल्या पाच साड्या, १० लेडीज ड्रेस चोरून नेला. दोन्ही दुकानांतून एकूण १ लाख ८७ हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: They also stole women's clothes theft in beauty parlour pune crime news