बक्षीस स्वीकारलं अन् स्टेज काेसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 12:18 IST2018-09-04T11:51:20+5:302018-09-04T12:18:14+5:30
पुण्यातील बुधवार पेठेत विजय शिवाजी तरुण मंडळाचा दहीहांडी साेहळा झाल्यानंतर बक्षीस समारंभावेळी अचानक स्टेज काेसळल्याने पंधरा ते वीस लाेक जखमी झाले.

बक्षीस स्वीकारलं अन् स्टेज काेसळला
पुणे : पुण्यातील बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळाच्या मंचावर गर्दी झाल्याने मंच काेसळला. साेमवारी रात्री दहीहांडी साेहळा झाल्यानंतर बक्षीस समारंभ सुरु असताना हा प्रकार घडला. यात पंधरा ते वीस लाेक जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली अाहे.
दहीहांडीचा उत्साह शहरात सर्वत्र काल पाहायला मिळाला. रात्री उशीरा बुधवार पेठेतील विजय शिवाजी तरुण मंडळाची दहीहांडी फाेडण्यात अाली. यावेळी माेठी गर्दी या भागात झाली हाेती. दहीहांडी फाेडल्यानंतर बक्षिस समारंभाचा कार्यक्रम सुरु हाेता. यावेळी अनेक कार्यकर्ते स्टेजवर अाल्याने स्टेज अचानक काेसळला. स्टेजवर जास्त वजन झाल्याने अधांतरी असलेला लाकडी स्टेज काेसळला. त्यानंतर एकच धावपळ उडाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात अाले. स्टेजवरील अनेकजण या अपघातात जखमी झाले असून काहींना गंभीर ईजा झाली अाहे. सुदैवाने यात काेणतीही जीवित हानी झाली नाही. स्टेज पडल्यानंतर एकच गाेंधळ झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरवातीला काेणालाच काहीच कळाले नाही. जखमींवर सध्या खासजी रुग्णालयात उपचार सुरु अाहेत.