शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

चर्चा तर होणार!...जेव्हा मनसेप्रमुख राज ठाकरे 'अचानक' भांडारकर संस्थेत धडकतात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 8:58 PM

यापूर्वी भांडारकरवर जेव्हा २००४ मध्ये हल्ला झाला होता तेव्हा राज ठाकरे यांनी संस्थेतील विद्वानांना सहकार्य केले होते..

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांना सुखद धक्का; जाणून घेतली मराठीच्या उगमाची माहिती

पुणे : वेळ सकाळी ९.३० वाजता...महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला भेट देण्याची इच्छा व्यक्त करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला...अनेक वर्षांपासून त्यांची संस्थेला भेट देण्याची इच्छा होती. परंतु या भेटीला मुहूर्त लागत नव्हता..अखेर शुक्रवारी हा योग जुळून आला.तब्बल दोन तास त्यांनी संस्थेमध्ये घालवून संस्थेचे प्रकल्प..विविध उपक्रम विशेषतः मराठी भाषेचा उगम कसा झाला? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.      राज ठाकरे यांची ही भेट पूर्णतः अनौपचारिक होती. शुक्रवारी सकाळी ते मुंबईहून पुण्याला निघाले होते. तेव्हा त्यांनी अनिल शिदोरे यांना भांडारकर संस्थेला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे ते पहिल्यांदाच संस्थेमध्ये आले. यापूर्वी जेव्हा भांडारकरवर २००४ मध्ये हल्ला झाला होता तेव्हा राज ठाकरे यांनी संस्थेतील विद्वानांना सहकार्य केले होते, असे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी ' लोकमत' ला सांगितले.

    या भेटीदरम्यान संस्थेचे कामकाज कसे चालते हे त्यांनी जाणून घेतले. याशिवाय मराठी भाषेचा उगम तसेच संस्कृत, तामीळ सारख्या भाषांशी तिचा असलेला संबंध याविषयी त्यांनी तज्ञांशी चर्चा केली. संस्थेची जुनी, दुर्मिळ हस्तलिखिते त्यांनी न्याहाळली. भांडारकर संस्थेच्या सुंदर आणि विस्तीर्ण परिसरात एक प्राचीन वटवृक्ष दिमाखात उभा आहे. या परिसरात खुला रंगमंच आकाराला येत आहे..त्या ज्ञानवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याची माहिती जाणून घेतली..या विस्तीर्ण वृक्षाच्या छायेत छायाचित्र काढण्याचा मोह देखील त्यांना आवरता आला नाही.  यावेळी संशोधक केदार फाळके यांचे ' संभाजी महाराजांची राजनीती' हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले असल्याचे डॉ पटवर्धन यांनी सांगितले.........

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेbhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणे