शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस संरक्षणात बांधकामे पडणार

By admin | Updated: March 15, 2015 00:42 IST

अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले.

पिंपरी : अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले. त्यानुसार शासनाची मंजुरी घेऊन महापालिकेने अभियंते, तसेच अन्य कर्मचारी वर्ग यांची भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यातच आता या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापालिकेनेही लवकरच कारवाईची मोहीम हाती घेण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याने १ एप्रिलपासून कारवाईला वेग द्यावा लागणार आहे.राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत तोडगा काढण्यासंबंधी स्थापन केलेल्या कुंटे समितीचा अहवाल शासनास सादर झाला आहे. त्यावर शासनाकडून पुढील निर्णय जाहीर झालेला नाही. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामप्रकरणी दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या निकालामुळे या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे महापालिकेला भाग पडू लागले आहे. ही कारवाई धिम्या गतीने सुरू आहे. कधी कर्मचारी संख्या अपुरी असल्याने मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे, तर कधी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण महापालिकेने पुढे केले होते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेला अवैध बांधकामावरील कारवाईसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्तीस शासनाची मंजुरी मिळविण्यापासून ते प्रत्यक्ष भरती प्रक्रियेपर्यंत महापालिकेला वेळ मिळाली. त्यामुळे कारवाईत चालढकल सुरू होती. १३ मार्चला अवैध बांधकामाविरुद्धच्या कारवाईसाठी पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असे आदेश थेट पोलीस आयुक्तांना न्यायालयाने दिले. पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या हालचाली यंत्रणेत सुरू झाल्या आहेत. बंदोबस्त मिळाल्यानंतर पालिकेला चालढकल करता येणार नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाविरुद्धची कारवाई अधिक तीव्र होणार आहे. (प्रतिनिधी)४अनधिकृत बांधकामाविरुद्धच्या कारवाईसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिकेने कनिष्ठ अभियंते, उपअभियंते, तसेच सर्व्हेअर अशा विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. सुमारे २१ हजार अर्ज आले असून, २९ मार्चला या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. महापालिकेची एकीकडे भरती प्रक्रियेची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्त उपलब्ध होणार असल्याने कारवाईसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तारांबळ उडाली आहे.