शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

‘विखे पाटलांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही’

By admin | Updated: September 23, 2015 03:10 IST

राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने दृष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावर उतरले असतील

पुणे : राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने दृष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावर उतरले असतील त़र या वयात विखे पाटलांच्या पोटात दुखण्याचे कारण काय अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पुण्यात केली.राज्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्यातील शेतक-यांना मदत मिळावी या मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील आठवडयात मराठवाडयामध्ये जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनाचा समाचार घेत माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील राज्यात सत्तेवर असताना पवारांनी काहीच केले नाही. मराठवाडयाचे पाणी बारामतीला पळविल्यामुळे त्यामुळे मराठवाडयावरील दुष्काळी स्थितीस पवारच जबाबदार असल्याची टीका केली होती. याबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, सिनियर विखे-पाटील हे वयाने मोठे आहेत. अशा वयस्कर माणसाबददल आपण बोल योग्य नाही. मात्र, दृष्काळी भागात काम करणा-या आपल्या सारख्या कार्यकर्त्याला या वक्तव्याचा खेद होतो. विखे पाटील हे सधन भागाचे नेतृत्त्व करणारे नेते आहेत. त्यामुळे राज्यातील दृष्काळाच्या छळा त्यांना काय माहित. मात्र, जर पवार साहेब हे राज्यातील दृष्काळीभागातील शेतक-यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी रस्त्यावर उतरले असतील तर या वयात विखेंच्या पोटात दुखण्याचे कारण नाही.’’