शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

बोगस ठरूनही डॉक्टरवर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:51 AM

बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणे... एका वैद्यकीय शाखेची पदवी असताना दुस-याच शाखेचा व्यवसाय करणे... नियमबाह्यपणे डॉक्टर ही पदवी लावणे.

विशाल शिर्के पुणे : बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणे... एका वैद्यकीय शाखेची पदवी असताना दुस-याच शाखेचा व्यवसाय करणे... नियमबाह्यपणे डॉक्टर ही पदवी लावणे... अशा बहाद्दरांवर कारवाई करण्यात महापालिका उणी ठरली आहे. डॉक्टर बोगस ठरूनही महापालिकेच्या जबाबदार अधिका-यांकडून संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एका बोगस डॉक्टर प्रकरणात महापालिके विरोधात दावा दाखल झाल्याने विधी विभागाकडून सबुरीचा सल्ला दिल्याने काही डॉक्टरांवर महापालिका आयुक्तांनी आदेश देऊनही गुन्हा दाखल झालेला नाही. दाव्याची भीती आणि वैद्यकीय विभागातील काही अधिकाºयांची उदासीनता अशा दुहेरी कात्रीत शहरातील नागरिकांचे आरोग्य सापडले आहे.महापालिकेच्या वतीने बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त त्याचे अध्यक्ष असून, त्यात ८ सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या बैठकीत दहा वैद्यकीय व्यवसाय करणाºयांबाबत तक्रार अर्ज दाखल झाले होते. समितीचे सदस्य गणेश बोºहाडे यांनी विनापरवाना व्यवसाय करणाºयांविरोधात तक्रार केली होती. रामकृष्ण कटकदौंड कोंढवा बिबवेवाडी रस्त्यावर व्यवसाय करतात. त्यांनी एमडी मेडिसीन असल्याचे भासवून व्यवसाय सुरू केला होता. तशी व्हिजिटिंग कार्डदेखील त्यांनी बनविली आहेत. याप्रकरणी बोºहाडे यांनी संबंधित व्यक्ती केवळ बारावी पास असल्याची तक्रार केली होती. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. रामकृष्ण कटकदौंड या नावाची नोंदणी नसल्याचा अभिप्राय दिला आहे. कायद्याने अशी नोंदणी असल्याशिवाय वैद्यकीय व्यवसायच करता येत नाही. महापालिकेला जानेवारी २०१८ मध्ये तसे पत्र परिषदेने पाठविले होते. त्यानंतरही संबंधितांवर काहीच कारवाई झालेली नाही. कटकदौंड नक्की कितवी पास आहेत, याचा पुरावा समोर आलेला नाही.बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीच्या बैठकीत आयुक्तांनी नॅचरोपथीचा व्यवसाय करणारे सुहास शेवाळे यांनी डॉक्टर उपाधी लावल्या प्रकरणी तीन दिवसांत पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. इलेक्ट्रोपथी मेडीकोज आॅफ इंडिया अणि नेचर क्युअरची पदवी असताना डॉक्टर नाव धारण केल्याप्रकरणी एस. एल. शिंदे यांच्या विरोधातही दावा दाखल करण्याचा आदेश दिला होता. मात्र, एका बोगस डॉक्टरप्रकरणी महापालिकेविरोधात दावा दाखल झाल्याने विधी विभागाकडून कारवाईबाबत सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे.>डॉक्टर उपाधी लावणे सोडलेरामोशी आळीतील वैद्य सागर कुमार यांनी मूळव्याध आणि भगंदर व्याधीचा वैद्य असल्याचा बोर्ड लावला होता. मात्र, वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या भेटीत दवाखाना बंद होता. त्यानंतर अनेकदा भेट देऊनही संबंधित दवाखाना बंदच असल्याचे महापालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. महापालिकेने कारवाईचा बडगा उगारताच काही जणांनी डॉक्टर ही उपाधी लावणे सोडून दिले आहे.>महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने रामकृष्ण कटकदौंड याची नोंद नसल्याचा अभिप्राय दिला आहे. त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले आहेत. कटकदौंड यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित एका दाव्याशी निगडित आहेत. त्यामुळे विधी विभागाने तूर्तास त्यांच्यावर कारवाई न करण्याचा सल्ला दिला आहे.- डॉ. वैशाली जाधव,सहायक आरोग्याधिकारी>महापालिका आयुक्त तथा बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीचे अध्यक्ष कुणाल कुमार यांनी चार महिन्यांपूर्वीच काही डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, एकाही व्यक्तीवर कारवाई झालेली नाही. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने रामकृष्ण कटकदौंड यांची नोंदणी नसल्याचे पत्र दिले आहे. आरोग्याधिकाºयांनी त्याप्रमाणे कारवाईचे आदेशही दिलेत. मात्र, त्यानंतरही वैद्यकीय अधिकाºयांकडून दोषी डॉक्टरांना पाठीशी घातले जात आहे. - गणेश बोºहाडे, सदस्य, बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती

टॅग्स :doctorडॉक्टर