पुणे : इराण, इस्त्राईल आणि अमेरिका युद्धाचा सर्वत्र परिणाम होऊ लागला आहे. या आखाती देशांमधून इंधन आणि गॅसची भारताला मोठ्या प्रमाणावर आयात होते. युध्दामुळे या आयात - निर्यातीमध्ये अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने उपाययोजना करणाया सुरुवात केली आहे. देशाला इंधन आणि गॅस कमी पडू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले आहे. अशातच देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांमुळे नागरिक पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा साठा करू लागले आहेत. त्याबाबत आता इंडियन ऑईलने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्ट वरून दिली आहे.
अलीकडील अहवाल आणि सोशल मीडियावरील चर्चांच्या पार्श्वभूमीवर, आम्ही सर्व संबंधितांना खात्री देऊ इच्छितो की, भारतातील इंडियन ऑईल नेटवर्कमध्ये पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा स्थिर आणि सुस्थितीत आहे. इंडियन ऑईलची सर्व रिटेल आउटलेट्स पूर्णपणे कार्यरत आहेत. एलपीजीचे वितरण नेहमीप्रमाणे सुरू आहे. इंधन किंवा स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही कमतरता नाही. इंडियन ऑईल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आपल्या देशव्यापी नेटवर्कमध्ये अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे. आमची पुरवठा साखळी रिफायनरींपासून डेपो आणि शेवटच्या टप्प्यातील वितरणापर्यंत कार्यक्षमतेने कार्यरत आहे. तसेच स्थानिक मागणीतील कोणत्याही चढ-उतारांना तोंड देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आम्ही ग्राहकांना आवाहन करतो की, त्यांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि घाबरून खरेदी करणे किंवा अनावश्यक साठा करणे टाळावे, कारण अशा कृतींमुळे अनावश्यक व्यत्यय येऊ शकतो.
Web Summary : Indian Oil assures stable fuel and gas supply amidst global concerns. No shortages are expected, and retail outlets are fully operational. Consumers are urged to avoid panic buying and trust official information, as the company monitors the situation closely.
Web Summary : इंडियन ऑयल ने वैश्विक चिंताओं के बीच ईंधन और गैस की स्थिर आपूर्ति का आश्वासन दिया। कोई कमी नहीं होने की उम्मीद है, और खुदरा आउटलेट पूरी तरह से चालू हैं। उपभोक्ताओं से आग्रह किया गया है कि वे घबराकर खरीदारी करने से बचें और आधिकारिक जानकारी पर विश्वास करें, क्योंकि कंपनी स्थिति पर बारीकी से नजर रख रही है।