Pune: पुण्याच्या रस्त्यांवर अजूनही खड्डेच खड्डे! महापालिका म्हणते, ३ महिन्यांत ११ हजार बुजविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 10:24 IST2025-08-08T10:23:22+5:302025-08-08T10:24:41+5:30

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे दिसून येत असल्याने २४७ खड्डुे बुजविणे शिल्लक असल्याचा दावा फोल ठरत आहे

There are still potholes on Pune's roads! Municipal Corporation says it has filled 11,000 in 3 months | Pune: पुण्याच्या रस्त्यांवर अजूनही खड्डेच खड्डे! महापालिका म्हणते, ३ महिन्यांत ११ हजार बुजविले

Pune: पुण्याच्या रस्त्यांवर अजूनही खड्डेच खड्डे! महापालिका म्हणते, ३ महिन्यांत ११ हजार बुजविले

पुणे: पुणे महापालिकेच्या पथ विभागने १ एप्रिलपासून आतापर्यंत शहराच्या विविध भागांतील रस्त्यावर ११ हजार ३८२ खड्डे बजुविले आहेत. आता केवळ शहरात २४७ खड्डुे बुजविणे शिल्लक असल्याचा दावा पथ विभागाने केला आहे; पण शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे हा दावा फोल ठरला आहे.

पुणे शहरातील जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. काही जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले आहेत. त्यातच शहरात ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई केली होती. या रस्ते खोदाईवर डागडुजीचे काम करण्यात आले होते; पण हे काम रस्त्याशी एकरूप झाले नाही. रस्ते खोदाई नंतरच्या वरवरच्या मलमपट्टीमुळे रस्ते उघडले आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, हे खड्डे अशास्त्रीय पद्धतीने बुजविले जात आहेत. त्यामुळे हे खड्डे पुन्हा उखडले जात आहे.

पथविभागाने १ एप्रिलपासून आतापर्यंत शहराच्या विविध भागांतील रस्त्यावर ११ हजार ६२९ खड्डे होते. त्यापैकी ११ हजार ३८२ खड्डे बजुविले आहेत. त्यासाठी २१ हजार १४९ मॅॅट्रिक टन माल वापरलेला आहे. आता केवळ शहरात २४७ खड्डुे बुजविणे शिल्लक असल्याचा दावा पुणे महापालिकेच्या पथ विभागाने केला आहे.

 

 

Web Title: There are still potholes on Pune's roads! Municipal Corporation says it has filled 11,000 in 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.