शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

दुरवस्थेमुळे प्रसूतिगृहे असून अडचण, नसून खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 5:05 AM

मोजक्याच ठिकाणी सिझर; महापालिकेच्या रुग्णालयांबाबत प्रशासन, पदाधिकारी उदासीन

- राजू इनामदार पुणे : सव्वादोनशे कोटी रुपयांचा वार्षिक खर्च, १७ प्रसूतिगृहे, ७४ ओपीडी, ३ मोठी रुग्णालये, १५० पेक्षा जास्त डॉक्टर व १ हजारांपेक्षा जास्त अन्य कर्मचारी... महापालिकेच्या आरोग्य विभागाचा हा भलामोठा व्याप सांभाळायला गेले सव्वा वर्ष मुख्य आरोग्य अधिकारीच नाही. दोन सहायक आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये अधिकारांची विभागणी करून सुरू असलेल्या या विभागाच्या कामाकाजाचा आता पुरता बोजवारा उडाला आहे. प्रसूतिगृहासारखी गरीब रुग्णांची व्यवस्थाही वाईट झाली असून, त्याबाबत प्रशासन किंवा पदाधिकारी गंभीरपणे काही करायला तयार नाहीत.खुद्द नगरसेवकांचाही महापालिकेच्या आरोग्य विभागावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच राजीव गांधी रुग्णालयासारख्या रुग्णालयाचा एक मोठा भाग खासगी वैद्यकीय संस्थेला चालविण्यास द्यावा, असा प्रस्ताव नगरसेविकांकडून महिला व बाल कल्याण समितीकडे पाठविला जातो. ओपीडी म्हणून बांधलेल्या इमारतीही खासगी वैद्यकीय संस्थांना चालवण्यास द्याव्यात, असा आग्रह नगरसेवकांकडून धरला जातो.महापालिकेची १७ प्रसूतिगृहे आहेत. कासेवाडी येथील सोनवणे हॉस्पिटलसारखी अत्यंत जुनी आहेत, तर राजीव गांधी रुग्णालयासारखे अलीकडेच बांधण्यात आलेले आहे. मात्र, सर्व ठिकाणी गंभीर स्थिती आहे. रुग्णालयात दाखल गर्भवती महिलांना दुसºया रुग्णालयात जाण्याचे सल्ले डॉक्टरांकडून दिले जातात, याचा अनुभव खुद्द महापौर मुक्ता टिळक यांनीच स्टिंग आॅपरेशन करून घेतला. गर्भवती माहिलांना लागणारी औषधे शिल्लक नाहीत, असे सांगण्यात येते. प्रसूती अडचणीत आली तर त्यावर मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणेही रुग्णालयांमध्ये नाहीत.प्र्रसूतीच्या आधीची व नंतरचीही बहुतेक औषधे नातेवाइकांना बाहेरूनच आणायला सांगतिली जातात. महापालिका औषधांवर वार्षिक कोट्यवधीचा खर्च करते. तरीही, औषधे शिल्लक नाहीत असेच ऐकवण्यात येते. ‘रुग्णालयाचा खर्च नाही तर मग औषधे आणायला काय हरकत आहे?’ असेही त्यांना सांगण्यात येते. प्रसूतीनंतर नवजात अर्भकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. त्याचीही विशेष व्यवस्था नाही. अपुºया कालावधीचे बालक असेल, तर त्याची विशेष दक्षता घ्यावी लागते. सीएसआर फंडामधून (खासगी कंपन्यांनी त्यांच्या नफ्यामधून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करायची कामे) मध्यंतरी नवजात अर्भकांसाठीची इनक्युबेटर ही व्यवस्था करण्यात आली. सोनवणे हॉस्पिटलमध्ये १२ व राजीव गांधी रुग्णालयात १२ बेड करण्यात आले. मात्र, अशा सुविधेसाठी २४ तास डॉक्टर व नर्स अशी व्यवस्था लागते. महापालिकेकडे ती नाही. त्यामुळे ही व्यवस्था असून नसल्यासारखी आहे. त्यामुळेच कंपनीने मध्यंतरी त्याविषयी संयुक्त बैठकीत तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे अशी गरज लागणाºया बालकांनाही दुसºया खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. एकूण १७ प्रसूतिगृहांमध्ये मिळून दरमहा साधारण ५५० प्रसूती केल्या जातात. त्यासाठी म्हणून महापालिका कोट्यवधी रुपयांचा वार्षिक खर्च करते. मात्र, त्याचा अपेक्षित लाभच संबधित महिलांना मिळत नाही.फिरत्या प्रसूतिगृह व्हॅनचा प्रस्तावसाधारण प्रसूती झाली, की ३ दिवसांत व सिझर झाले तर ७ दिवसांमध्ये महिलेला घरी पाठविण्यात येते. सिझर करण्याची व्यवस्था मोजक्याच प्रसृतिगृहांत आहे. जिथे ती व्यवस्था नाही, तिथे सिझरची गरज पडल्यास त्या महिलेला ज्या रुग्णालयात ती व्यवस्था आहे, तिथे हलवले जाते किंवा मग खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णावहिकेची व्यवस्था ज्यांची अडचण आहे, त्यांनाच करावी लागते. महिलांना दुसºया रुग्णालयात हलवायचे असेल, तर त्यासाठी महापालिकेने दोन अद्ययावत सुसज्ज फिरत्या प्रसूतिगृह व्हॅन तयार कराव्यात, असा प्रस्ताव खुद्द महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले व नगरसेविका वृषाली चौधरी यांनी दिला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिला