राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी : चांदीचे कवच लांबवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 03:00 PM2019-11-09T15:00:50+5:302019-11-09T15:22:42+5:30

राजगुरूनगर येथील सिध्देश्वर मंदिराचे दरवाज्याचे कुलुप तोडुन मंदिरारातील गाभाऱ्या मधील शंकराच्या पिडीवरील १५ किलो चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी लांबविलेल्या चांदीच्या कवचाची किंमत सात लाख वीस हजार आहे.

Theft at Siddheshwar Temple in Rajgurunagar: Silver armor stolen | राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी : चांदीचे कवच लांबवले 

राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात चोरी : चांदीचे कवच लांबवले 

googlenewsNext

पुणे (राजगुरुनगर) : राजगुरूनगर येथील सिध्देश्वर मंदिराचे दरवाज्याचे कुलुप तोडुन मंदिरारातील गाभाऱ्या मधील शंकराच्या पिडीवरील १५ किलो चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी लांबविलेल्या चांदीच्या कवचाची किंमत सात लाख वीस हजार आहे. चोरटे सी टीव्हीमध्ये कैद झाले असुन पोलिस कसून चौकशी करीत आहेत

 राजगुरूनगर शहरातील भिमानदीकाठी लगत प्राचिन काळातील हेमाडपंथी असे सिध्देश्वर मंदिर आहे. हे मंदिर राजगुरुनगरमधील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. परिसरात निसर्गरम्य वातावरण असून भाविकांची येथे नेहमी गर्दी असते. (दि. ८ )रोजी सांयकाळी साडेपाच वाजता पुजा व आरती उरकुन रात्री ९.३०वाजता मुख्य दरवाजा बंद करून पुजारी महेश शंकर गुरव  मंदिरालगत असणाऱ्या खोलीत झोपण्यास गेले होते. सकाळी पहाटे साडेपाच वाजता देवाची पुजा आरती करण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता असता पिंडीवर चांदीचे कवच नसल्याचे निर्दशनास आले. त्यांनी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष एकनाथ सांडभोर, महेंद्र मधवे यांना हा चोरीचा प्रकार कळविला..भाविकांनी ६ वर्षापुर्वी सुमारे १५ किलोचे चांदीचे कवच नक्षीकाम करुन मंदिरारातील गाभाऱ्यातील शंकराच्या पिडींवर बसविण्यात आले होते. रात्री २ वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पुर्वेकडील असलेल्या लोखंडी दरवाज्याचा कोंडा कटवाणीने तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधुन आतमध्ये प्रवेश केला. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचे दोन कुलुपे कटावणीने तोडून गाभाऱ्यात गेले गाभाऱ्यामधील चोरी करताना कोणी पाहू नये म्हणून तसेच काही दिसू नये म्हणून चोरट्यांनी मंदिरात टाकलेले लाल कलरचे मॅट चोरट्यांनी मंदिराच्या दर्शनी भागातील दरवाज्यावर टाकले.गाभाराऱ्यातील पिंडीचे कवच १० मिनटांत चोरट्यांनी हाताने काढुन चांदीचे कवच घेऊन तोडलेल्या दरवाज्या वाटे पळून गेले.

हा सर्व प्रकार सी सी टीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनास्थळी खेड पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली. याबाबत महेश गुरुव यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यापुर्वी मंदिरातील दानपेटी फोडून १० हजार रुपये चोरट्यांनी लांबविले होते.

Web Title: Theft at Siddheshwar Temple in Rajgurunagar: Silver armor stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.