Pune | भरदिवसा घरफोडी करून तीन लाखांचा ऐवज चोरी; मंचर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 17:06 IST2023-02-04T17:04:15+5:302023-02-04T17:06:24+5:30
मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Pune | भरदिवसा घरफोडी करून तीन लाखांचा ऐवज चोरी; मंचर परिसरातील घटना
मंचर (पुणे) : घराचा दरवाजा तोडून चोरट्याने तीन लाख १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने,रोख रक्कम व मोबाइल चोरून नेला आहे. ही घटना अवसरी खुर्द गावच्या हद्दीत खेडकरमळा येथे घडली. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवसरी खुर्द गावच्या हद्दीत खेडकरमळा येथे प्रसाद खेडकर यांच्या घरी चोरीचा प्रकार गुरुवारी दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून सोन्याचे मंगळसूत्र,सोन्याची बोरमाळ, सोन्याची चैन,बारा हजार रुपये रोख व एक मोबाइल असा एकूण तीन लाख १८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मांडवे करीत आहेत.