theft in nakoda jewellers in aundh parihar pune | Video - औंध परिहार चौकातील सराफा दुकान चोरट्यांनी फोडले
Video - औंध परिहार चौकातील सराफा दुकान चोरट्यांनी फोडले

पुणे - औंध परिसरातील परिहार चौकात असलेले नाकोडा ज्वेलर्स हे सराफा दुकान चोरट्यांनी फोडले असल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी तब्बल 20 ते 25 तोळे सोने व काही किलो चांदीचे दागिने, वस्तू चोरून नेले आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष सोनिगरा यांचे नाकोडा ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. बुधवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले. त्यानंतर चोरट्यांनी पहाटे तीनच्या सुमारास कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील 20 ते 25 तोळे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. पहाटेच्या सुमारास जवळ राहणाऱ्यांना दुकान उघडे असल्याचे दिसल्यावर त्यांनी सोनिगरा यांना फोन करुन चोरी झाल्याचे सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून नेमका किती ऐवज चोरीला गेला आहे, याची माहिती घेतली जात आहे.


Web Title: theft in nakoda jewellers in aundh parihar pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.