पवनाधरण परिसरातील अभिनेत्री संगिता बिजलानीच्या बंगल्यात चोरी;५७ हजारांचा मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 10:31 IST2025-07-19T10:29:54+5:302025-07-19T10:31:31+5:30
तिकोणा पेठ भागातील या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

पवनाधरण परिसरातील अभिनेत्री संगिता बिजलानीच्या बंगल्यात चोरी;५७ हजारांचा मुद्देमाल लंपास
पवनानगर - बॉलीवूड अभिनेत्री संगिता बिजलानीच्या पवनाधरण परिसरातील बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिकोणा पेठ भागातील या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे संगिता बिजलानीकडे खाजगी कामगार आहेत. चार महिन्यांनंतर, १८ जुलै रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास संगिता बिजलानी आपल्या बंगल्यावर आल्या असता, चोरीची घटना उघडकीस आली. ७ मार्च २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत या बंगल्यात कोणी राहत नव्हते.
चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूने कंपाऊंड फोडून, पहिल्या मजल्यावर प्रवेश केला आणि टीव्ही तसेच रोख रक्कम चोरून नेली. अशीही माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. बोकड व विजय गाले या प्रकरणाचा तपास करत आहेत.