शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त केलेले चार ट्रक पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 9:31 PM

पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडी जकातनाका बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई करण्यात आली होती.

ठळक मुद्देबेकायदा वाळू उपसा करणाऱ्या चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची शक्यता

पुणे : बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेले चार ट्रक क्वीन्स गार्डन येथील हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी गोकुळ भगत (वय ४३) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडी जकातनाका बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकवर कारवाई करण्यात आली होती. वाळूने भरलेले चार ट्रक क्वीन्स गार्डन येथील अल्पबचत संकुल प्रवेशद्वार क्रमांक दोन आणि लगत असलेल्या हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. मात्र वाळूने भरलेले चारही ट्रक पळवून नेण्यात आले. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार डी. व्ही. शिंदे करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसsandवाळू