शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
4
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
5
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
6
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
7
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
8
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
9
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
10
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
11
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
12
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
13
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
14
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
15
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
16
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
17
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
18
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
19
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
20
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

पोलिसांचा दृश्य वावर वाढल्याने घरफोड्या, चोऱ्यांमध्ये घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 8:29 PM

सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़.

ठळक मुद्देघरफोड्या उघडकीस येण्याचे प्रमाण गतवर्षीपेक्षा २२ टक्क्यांनी कमी रात्री घरफोड्या उघडकीस येण्यात ८ टक्क्यांनी घट गेल्या तीन महिन्यात ७० हून अधिक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेडिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेशन या तत्वाचा अवलंब करुन तसेच सराईत गुन्हेगारांवर वॉच

विवेक भुसेपुणे : शहरातील वाढत्या घरफोड्या, चोऱ्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी शहर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरु केलेल्या विविध उपाय योजनांनी महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे़. त्यात रस्त्यावरील गस्त वाढविणे, सराईत गुन्हेगारांची सातत्याने तपासणी,रस्त्यावर पोलिसांचा जास्तीतजास्त वावर वाढविणे अशा छोट्या छोट्या उपायांचा अवलंब केल्याने गतवर्षीच्या तुलनेत घरफोड्या, चोऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे़. त्यावेळी वाहनचोरीच्या घटनेत घट झाली असली तरी गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणात मात्र वाढ झालेली नाही़. १ जानेवारी ते १९ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान शहरात दिवसा घरफोड्या (-६५) आणि रात्री होणाऱ्या घरफोड्यांच्या (-२२) गुन्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येते़. त्याचबरोबर सर्व चोºयांच्या घटनांमध्ये ३९७ने घट झाली आहे़ त्याचवेळी दरोडा, जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ .सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यभराची कमाई एका चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात चोरुन नेली जाते़. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो़. हे लक्षात घेऊन शहर पोलिसांनी हे गुन्हे रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हे गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येऊ लागली आहे़. त्यात शहरात नव्याने ३० पोलीस मोबाईल व्हॅन आल्या आहेत़. ज्या ठिकाणाहून पोलीस नियंत्रण कक्षाला अधिक कॉल येतात, त्याचा अभ्यास करुन अशा ठिकाणी गुन्हे होण्यापूर्वीच ते रोखण्यासाठी या पोलीस मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत़. महत्वाच्या ठिकाणी पोलीस व्हॅन व त्यात तयारीत असलेल्या पोलीस कर्मचारी हे पाहून रस्त्यावरील पोलिसांचा वावर वाढल्याचे दिसून येऊ लागले़. त्याचबरोबर गुन्हेगारांच्या तपासणीसाठी स्कीप्ट योजना सुरु करण्यात आली आहे़. त्यात बीट मार्शल त्यांच्या हद्दीतील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेतात़. त्यामुळे गुन्हेगारही पोलिसांचा आपल्यावर वॉच असल्याचे पाहून त्यांच्याकडून होणाºया गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे़. शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारांचीही तपासणी सुरु झाल्याने तडीपार असतानाही शहरात येत असलेल्या गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात सापडण्याचे प्रमाण वाढले आहे़. गुन्ह्यांचे प्रमाण घटले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत दिवसा घरफोडी, सर्व चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणातही घट झालेली दिसून येते़. दिवसा घरफोड्या उघडकीस येण्याचे प्रमाण गतवर्षीपेक्षा २२ टक्क्यांनी कमी आहे़ तर रात्री घरफोड्या उघडकीस येण्यात ८ टक्क्यांनी घट आहे़. सर्व चोरीचे गुन्हे उघडकीस येण्यास गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी आहे़. घरफोड्यांच्या तपासासाठी गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्तांच्या देखरेखीसाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यात ७० हून अधिक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत़. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुन्हे उघडकीस असण्याचे प्रमाण पहाता जबरी चोरी, दिवसा व रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे़.  .......................डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेशनगुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हे उघडकीस आणण्यावर शहर पोलीस दलाकडून भर देण्यात येत आहे़. डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेशन या तत्वाचा अवलंब करुन तसेच सराईत गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हे रोखण्यात येत आहेत़. गेल्या तीन महिन्यात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले असून यापुढील काळात त्यावर अधिक भर देण्यात येणार असून अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे़. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त़़़़़़़़़़़़़़़़़़़१ जानेवारी ते १९ आॅक्टोंबर दरम्यान  गुन्ह्यांची माहिती                                              २०१८                                              २०१७गुन्ह्याचा प्रकार    दाखल    उघड    टक्केवारी    दाखल    उघड    टक्केवारी    फरकजबरी चोरी            २७७       २२३      ८१             २३२        २१९        ९४            ४५दिवसा घरफोडी    ११३         ५३      ४७             १७८        ११८          ६६         -६५    रात्री घरफोडी        ३७०       १८१       ४९            ३९२       २२४         ५७           -२२सर्व चोरी            २९००       ९४१      ३२            ३२९७      १२४५       ३८           -३९७वाहन चोरी        १६१९        ४५६      २८           १७४१      ६२०         ३६           -१२२इतर चोरी            १२२२     ४६७       ३८            १४६५    ५८३          ४०            -२४३एकूण मालमत्तेचे गुन्हे    ३६९८    १४३४         ३९        ४१२८        १८३५         -४३० गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हे उघडकीस आणण्यावर शहर पोलीस दलाकडून भर देण्यात येत आहे़. डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेशन या तत्वाचा अवलंब करुन तसेच सराईत गुन्हेगारांवर वॉच ठेवून गुन्हे रोखण्यात येत आहेत़. गेल्या तीन महिन्यात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले असून यापुढील काळात त्यावर अधिक भर देण्यात येणार असून अधिकाधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे़. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर