शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त

By यदू जोशी | Published: May 09, 2024 8:41 AM

Maharashtra Lok sabha Election: निवडणुकीच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी मतदारांवर भिस्त, मुंबई आणि परिसर राहणार केंद्रस्थानी

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही सिनेमे असे असतात, की ज्यांची स्टोरी अर्ध्या तासातच समजून जाते. पण काहींमध्ये खूप सस्पेन्स असतो आणि तो हळूहळू उलगडत जातो.  प्रेक्षक म्हणून आपण सुरुवातीला जो अंदाज बांधतो, त्याच्या विपरीत सिनेमात पुढे घडत जाते. महाराष्ट्राच्या राजकीय सिनेमाचा मध्यंतर झाला आहे. लोकसभेच्या ४८ पैकी २४ जागांवर निवडणूक झाली असून, २४ मध्ये व्हायची आहे. आता काय होणार? पिक्चर अभी बाकी है दोस्त... 

 ग्रामीण महाराष्ट्राचे बोट धरून सुरू झालेली लोकसभेची निवडणूक चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी भागात प्रवेश करणार आहे. उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यासह काही ग्रामीण आणि काही आदिवासी भागदेखील असेलच; मात्र, मुंबई आणि परिसराभोवती ही निवडणूक आता फिरणार आहे.  उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे संघर्ष तीव्र होईल.

ठाकरे, शिंदे यांची सर्वांत मोठी परीक्षाउद्धव सेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि शिंदे सेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उरलेले दोन टप्पे परीक्षेचे असतील. शिंदे यांच्या वाट्याला  आलेल्या १५ पैकी नऊ जागांची निवडणूक या दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. ­त्यात त्यांचा गड मानला जाणारा ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघदेखील आहेत. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे भारी का एकनाथ शिंदे भारी, याचा फैसलाही यानिमित्ताने होणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले औरंगाबाद उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदे यांचे, याचा कौल मतदार देणार आहेत.

हे प्रश्न रडारवर....उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका कोणाला बसेल? नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात कांदा कोणाला रडवणार? मुंबईत मराठी, बिगर मराठी मतांचे राजकारण कसे वळण घेईल? 

विदर्भात उरले कवित्वविदर्भातील सर्व दहा जागांची निवडणूक आटोपली आहे. तिथे आता निकालाचे कवित्व तेवढे उरले आहे. उन्हानेकाहिली होत असताना निकालाचे आडाखे-तडाखे बांधले जात आहेत. ज्या विषयाची निवडणुकीत दरवेळी विदर्भात मोठी चर्चा होते, त्या सट्टा बाजाराचा कौल कोणाकडे हादेखील चर्चेचा विषय आहे. सोबत आपापल्या परीने प्रत्येकजण जातीय समीकरणांची फोडणी देत आहे. डीएमके म्हणजे ‘दलित, मुस्लिम, कुणबी’ या फॉर्म्युल्याची चर्चाही जोरात  सुरू असल्याचे दिसते.

शहरी मतदार कोणासोबत? आधीच्या तीन टप्प्यांमधील मतदानाचा आगामी दोन टप्प्यांवर काय परिणाम होतो, हेही महत्त्वाचे असेल. पुणे, मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील मतदारसंघ उर्वरित दोन टप्प्यांमध्ये प्रामुख्याने आहेत. एमएमआर क्षेत्रात राजकीय समीकरणे ही जातीपलीकडची असतात. मोदी विरुद्ध ठाकरे, मोदी विरुद्ध राहुल गांधी या राजकीय संघर्षात मतदार कोणासोबत ते ठरेल. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका तेवढी महत्त्वाची नव्हती. मात्र, आता ते सभांचा सपाटा लावतील का आणि त्यात कोणावर कशी तोफ डागतील, याविषयी उत्सुकता असेल.

पवार फॅमिली वॉरवर तूर्तास पडदाबारामतीतील लढतीच्या निमित्ताने शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबातील वाद याची प्रचंड चर्चा प्रचार काळात झाली. पवार कुटुंबातील अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुले वगळता, इतर सर्व सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसले.आतापर्यंत अभेद्य राहिलेल्या पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण झाल्याचे महाराष्ट्राने बघितले. आता बारामतीची निवडणूक आटोपली असल्याने पवार कुटुंबातील  वॉर तूर्तास थांबले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आहेत, असे चित्र असलेल्या शिरूर मतदारसंघात फक्त आता मतदान बाकी आहे.

अजित पवारांची पाव परीक्षा बाकीअजित पवार गटाला मिळालेल्या चार पैकी तीन जागांची म्हणजे बारामती, उस्मानाबाद आणि रायगडची निवडणूक झाली आहे. आता त्यांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरूरची निवडणूक तेवढी बाकी आहे. अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांचा प्रभाव असलेल्या पट्ट्यात, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सेनेला त्यांची किती मदत होते हे महत्त्वाचे असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली आहेच.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपा