बंडू, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; न्यायालयाकडून परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:34 IST2025-12-10T20:32:41+5:302025-12-10T20:34:53+5:30

निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,' असे नमूद करत न्यायालयाने आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले.

The way is clear for Bandu, Lakshmi and Sonali Andekar to contest elections; Permission from the court | बंडू, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; न्यायालयाकडून परवानगी

बंडू, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; न्यायालयाकडून परवानगी

पुणे : नातू आयुष कोमकर खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात बंडू आंदेकर, त्याची भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष 'मकोका' न्यायालयाने आरोपीना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,' असे नमूद करत विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच निवडणुकीसाठी नामांकनपत्र सादर करण्यासह त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोपींनी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्ताच्या मागणीसाठी अर्ज करावा, त्यावर परिस्थिती विचारात घेऊन आदेश दिले जातील, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष याचा दि. ५ सप्टेंबरला गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, तिघे रा. नाना पेठ) यांच्यासह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्याची परवानगी मागण्यासाठी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी अॅड. मिथुन चव्हाण यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद अॅड. मिथुन चव्हाण यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना नियमानुसार निवडणूक लढविण्यास परवानगी दिली.

बंडू आंदेकर तसेच सोमनाथ गायकवाड यांच्या टोळी युद्धातून वनराज आंदेकर यांचा गेल्या वर्षी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. या खूनाचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

Web Title : आंदेकरों को हिरासत के बावजूद चुनाव लड़ने की अनुमति; कोर्ट की मंजूरी

Web Summary : बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर और सोनाली आंदेकर को पुणे महानगरपालिका चुनाव लड़ने की अनुमति मिली। विशेष अदालत ने चुनाव लड़ने के संवैधानिक अधिकार का हवाला देते हुए अनुमति दी। अदालत ने नामांकन प्रक्रिया के दौरान सुरक्षा व्यवस्था पर भी ध्यान दिया।

Web Title : Andekars Cleared to Contest Election Despite Custody; Court Allows

Web Summary : Banned Bandoo Andekar, along with Laxmi Andekar and Sonali Andekar, are now permitted to contest Pune Municipal Corporation elections. A special court granted permission, citing every citizen's constitutional right to contest elections. The court also addressed security arrangements during the nomination process.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.