शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

'बाळा' ला ती खेळण्यातली गाडी वाटली; पोर्शेचा वेग पाहूनच उडाला थरकाप, RTO रद्द करणार नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 13:32 IST

आराेपी बाळ १७ वर्षे आठ महिने वयाचा असून, अपघातावेळी ताेच कार चालवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय.  याप्रकरणी सदर कारची बंगळुरू आणि पुण्यातील नोंदणी रद्द करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे.

यातील आराेपी बाळ १७ वर्षे आठ महिने वयाचा असून, अपघातावेळी ताेच कार चालवत होता, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नाेंदणी क्रमांक मिळण्यापूर्वीच ही कार सुमारे १६६ किलोमीटर चालली असल्याचे आरटीओच्या तपासणीत आढळून आले. विशेष म्हणजे या कारचा वापर आरोपी बाळच करत होता, हेदेखील सिद्ध झाले आहे.

अपघातग्रस्त पाेर्शे कारची पुण्यातील नोंदणी प्रक्रिया रद्द केली आहे. बंगळुरू आरटीओने देखील त्या कारची तात्पुरती नोंदणी रद्द करावी, असे पत्र पुणे ‘आरटीओ’कडून पाठवण्यात आले आहे. या कारने दुचाकीला धडक दिली, तेव्हा तिचा वेग ताशी १६० किलोमीटर असल्याचेही दिसून आले. याबाबत पोर्शे कंपनीच्या नऊ सदस्यांच्या पथकाने सोमवारी तपासणी केली असून, त्याचा अहवाल त्यांनी पोलिसांकडे सोपवला आहे. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी

वेग पाहून प्रत्यक्षदर्शींचाही थरकाप उडाला  विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिली. यावेळी त्या गाडीचा वेग इतका होता कि डोळ्याची पापणी मिटेपर्यंत पोर्शे कार समोरून पास झाली. दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुणी अक्षरशः १० फूट उंच उडून खाली पडली. तर तरुण लांब फेकला गेला. क्षणार्धातच दोघांचा जीव गेला. हि घटना पाहून प्रत्यक्षदर्शींचाही थरकाप उडाला होता.  

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूRto officeआरटीओ ऑफीस