शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Pune Heatwave: तापमान वाढतंय! पुणेकरांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:30 IST

Heatwave in Pune: पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत असून, जिल्ह्यात शिरूरमध्ये तापमानात वाढ होत आहे

पुणे: पुणे शहरात सध्या ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे. पुढील चार-पाच दिवसांमध्ये याच्या खालीच तापमान राहील. पण दुपारच्या वेळी उन्हाचा चटका लागणार आहे. म्हणून नागरिकांनी त्या कालावधीत घराबाहेर पडू नये, अन्यथा उष्णतेचा त्रास होऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्येही शिरूर, कोरेगाव पार्क रविवारी (दि.२) सर्वाधिक ‘हॉट’ ठरले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये कमाल तापमान वाढले असून, किमान तापमानही वाढले आहे. किमान तापमान १४ ते १५ अंशांवर होते, ते आता १७ अंशाच्या पुढे नोंदविले जात आहे. राज्यामध्ये सोलापूर ३७.९, मालेगाव ३७.६, जळगाव ३६.२, रत्नागिरी ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.सध्या राज्यातही उष्णता जाणवत असून, ३ व ४ मार्च रोजी दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे दक्षिण महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. यानंतर उत्तर दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे पुढील ४-५ दिवस राज्यातील दिवसभराचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे, असे कश्यपी यांनी सांगितले.

शहरात येथे अधिक तापमान !

गेल्या तीन-चार वर्षांपासून पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत आहे. त्या परिसरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. स्थानिक पातळीवरील बदल हा येथील अधिक तापमानाचे कारण असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुण्यातील कमाल तापमान

शिरूर : ३८.२कोरेगाव पार्क : ३८.१पुरंदर : ३७.४चिंचवड : ३६.८मगरपट्टा : ३६.५शिवाजीनगर : ३६.२एनडीए : ३५.८वडगावशेरी : ३५.७हवेली : ३५.६लोणावळा : ३५.४पाषाण : ३५.०बारामती : ३५.२भोर : ३४.३

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानenvironmentपर्यावरणNatureनिसर्गWaterपाणीSocialसामाजिकHealthआरोग्यweatherहवामान अंदाज