शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

Pune Tasty Katta: तिखटावलेल्या जिभेला लोण्याची गोडी; पुण्यातील दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा

By राजू इनामदार | Updated: August 17, 2022 15:47 IST

लोण्याच्या मुक्त वापरामुळे या पदार्थाला एक निराळीच चव

पुणे : कुठे लांब कर्नाटकातले एक गाव. दावणगिरी. तिथे तयार होणाऱ्या पदार्थाला महाराष्ट्रात इतका भाव मिळेल याची त्यांनाही कल्पना नसेल. डोसा, घावण, आपली आंबोळी यापेक्षा हे थोडे वेगळे प्रकरण आहे. तर्रीबाज खाऊन कंटाळलेल्यांसाठी हा एक चांगला उतारा आहे. लोण्याच्या मुक्त वापरामुळे या पदार्थाला एक निराळीच चव येते.

पीठ तयार करायची प्रक्रिया नेहमीच्या डोशासारखीच. रेशनिंगचाच तांदूळ वापरायचा. चांगला इंद्रायणी वगैरे वापरायला जाल तर फसाल. भिजवायचा, त्यात उडदाची डाळ, मेथीचे दाणे वगैरे टाकायचे. भिजवायचे, मिक्सरमधून काढायचे. झाले पीठ तयार. पितळेच्या, ॲल्युम्युनियमच्या भांड्यात ते कधीही ठेवायचे नाही. फक्त स्टिलच्या भांड्यात ते ठेवून द्यायचे. ८ ते १० तासांनंतर चांगले पीठ तयार होते. ते घोटवून घ्यायचे. झाले दावणगिरीसाठीचे पीठ तयार.

आता जवळ लोणी पाहिजे भरपूर. तवा तापला की त्याला लोणी लावायचे. त्यावर डावाने पीठ सोडायचे. वाटीने तो गोलसर व जाड करून घ्यायचे. गरम व्हायला लागले की त्याला चांगली जाळी पडू लागते. त्यावर लोणी लावायचे नाही तर टाकायचे. खरपूस वास यायला लागला की हवी असेल तर पलटी मारायची किंवा मग थेट डिशमध्ये. फोडणी दिलेली खोबऱ्याची चटणी, बटाट्याची सुकी व थोडी ओलसर अशी भाजी. याबरोबर हा प्रकार एकदम चविष्ट लागतो. गरम असतानाच खाणे चांगले.

रास्ता पेठेत अपोलो थिएटरसमोर काही वर्षांपूर्वी विनायक घोडके व ऋषिकेश कसवकर या युवकांनी एक गाडी सुरू केली. आज या ठिकाणी पिझ्झापासून ते पनीर कबाबपर्यंतची एक मोठी चौपाटीच सुरू झाली आहे. स्पंज डोशाची गाडी मात्र अजूनही जोरात सुरू आहे. आता या डोशाशिवाय तिथे अप्पे, मिल्कशेक असे प्रकारची मिळतात. आता तर पुण्यात कुठेही गेले तरी एखादी तरी दक्षिण दावणगिरीची पाटी दिसतेच, पण पीठ, लोणी हे पाहून घ्यायचे आणि मगच खाण्याची ऑर्डर द्यायची. तेवढी काळजी तर घ्यावीच लागते. तिखटजाळ खाऊन खाऊन जीभ हुळहुळी झालेली असते. म्हणजे भूक तर लागतेच, पण जिभेला थोडी तिखट लागू देत नाही. त्यावेळी हे दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसे कामाला येतात. पोटभर खाता येतात. त्रास कसलाच नाही. एका डिशमध्ये लहान लहान आकाराचे ३ डोसे मिळतात.

कुठे - रास्ता पेठेत व आता तर पुण्यात कुठेहीकधी - काही ठिकाणी दिवसभर तर काही ठिकाणी दुपारी ४ पासून रात्री उशिरापर्यंतकाय खाल - लोणी स्पंज डोसा. अप्पे

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्रmilkदूधHealthआरोग्य