शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरातील वडापुरी येथे श्री अंबाजी लिंबाजी देवस्थानच्या पुजारी महिलेचा धक्कादायक स्वरूपात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 16:14 IST

महिला श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गेल्या २० ते २५ वर्षापासून पुजारी म्हणून सेवा करीत होत्या.

बावडा: वडापुरी (ता. इंदापूर जि. पुणे) येथील अंबाजी लिंबाजी देवस्थानच्या पुष्पा शंकर कोमकर (वय ५५) या महिला पुजारी गंभीर स्वरूपाच्या घाव आलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना आढळून आल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर महिला पुजारी यांचा मृत्यू हा धक्कादायक घटनेतून झाली असल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसून येत आहे. सदरील घटनास्थळी इंदापूर पोलिसांचे पथक दाखल झाले असून अधिक तपासासाठी पुणे येथील डॉग स्कॉड व न्यायवैद्यक पथक पाचारण करण्यात आले आहे.

पुष्पा कोमकर या श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गेल्या २० ते २५ वर्षापासून पुजारी म्हणून सेवा करीत होत्या. तसेच त्या तेथेच कायम वास्तव्यास असून किराणा दुकान चालवत उदरनिर्वाह आपल्या पतीसह करीत होत्या. आज (दि.१३) रोजी सकाळी नऊ ते दहा वाजल्याच्या दरम्यान त्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर स्वरूपाचे घाव तीन ते चार ठिकाणी आसलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. कोमकर यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले.  अधिक तपासानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरTempleमंदिरSocialसामाजिकWomenमहिलाDeathमृत्यू