शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा - रूपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:32 IST

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत.

धायरी : पुण्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती , सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या पीडितेच्या पती , सासू , सासरे यांना अटक झाली होती. तर आज फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे मांत्रिकाने सांगितले तसेच तिला जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला यावरून आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करत असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेलच परंतु या सर्व घटना का घडत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.  

हे समूळ नष्ट करणे ही तुमची , आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी असून  या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्यपूर्वक विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.  अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे  व समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृती ची आवश्यकता आहे.  महाराष्ट्र राज्य महिला आयोगानी ह्याची गंभीर दखल घेतली असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पण अशा मुद्द्यांवर जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :DhayariधायरीRupali Chakankarरुपाली चाकणकरWomenमहिलाPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण