Pune : पिंपरे खुर्दमधील रेल्वे गेट १२ तास राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 18:39 IST2022-10-17T18:38:01+5:302022-10-17T18:39:34+5:30

यादरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे...

The railway gate in Pimpre Khurd will remain closed for 12 hours | Pune : पिंपरे खुर्दमधील रेल्वे गेट १२ तास राहणार बंद

Pune : पिंपरे खुर्दमधील रेल्वे गेट १२ तास राहणार बंद

नीरा (पुणे) : नीरा-जेऊर मार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत असणारे रेल्वे गेट मंगळवारी दिवसभर वाहतुकीसाठी १२ तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यादरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असेही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुरंदर तालुक्यातील नीरा-जेऊर, मांडकी या मार्गावर मिरज- पुणे रेल्वे लाइनवरील थोपटेवाडी येथे रेल्वेचे नंबर २८ किलोमीटर ८० / ४-५ गेट आहे. हे गेट रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी मंगळवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मांडकी व जेऊर ग्रामपंचायतीला दिली आहे. यादरम्यान जेऊर, मांडकीच्या नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

रविवारपासूनच मांडकी, जेऊर या ऊस बागायत पट्ट्यातून सोमेश्वर कारखान्याकडे ऊस वाहतूक सुरू झाली आहे. आधीच पावसाने ऊसतोडणी कामगारांसह स्थानिकांना अडचण निर्माण झाली आहे. त्यात आता १२ तास रेल्वे गेट बंद राहणार असल्याने अडचणीत वाढ होणार आहे.

Web Title: The railway gate in Pimpre Khurd will remain closed for 12 hours