शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Video: नाकाबंदी दरम्यान पोलिसाचा प्रताप! चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले, कल्याणीनगर भागातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:31 IST

पोलिसांनी वाहन चालकास आडवले आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला तर एका पोलीस अधिकाऱ्याने युवकाला चक्क पाय दाबण्यास सांगितले

पुणे: पॉर्शे कार अपघातामुळे कल्याणीनगर हे नाव एव्हाना सर्वदूर पोहचलं, याच कल्याणीनगर परिसरात नाकाबंदी दरम्यान रात्रीच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांचा एक प्रताप समोर आलंय. काल रात्री कल्याणीनगर परिसरात नाकाबंदी दरम्यान वाहन तपासणी करताना पोलीस अधिकाऱ्याने चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आधीच पोर्षे अपघात प्रकरणामुळे पुणे पोलिसांवर सुरुवातीला संशय व्यक्त केला होता, या प्रकरणात हलगर्जिपणा केल्यामुळे येरवडा पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. त्यात आता पुन्हा पोलिसांचा कारनामा समोर आलाय. सणसवाडी परिसरातील काही युवक कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12.20 वाजता कल्याणीनगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. पोलिसांनी वाहन चालकास आडवले आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला. एका पोलीस अधिकाऱ्याने युवकाला चक्क पाय दाबण्यास सांगितले, अशी प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर आणि माध्यमांवर दिसताच वाहतूक पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. 

पीएसआय गोराडे, वय ५७, येरवडा वाहतूक विभाग हे ॲडलॅब्स चौक, कल्याणीनगर येथे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत होते.  2 दिवस रात्री आणि दिवसा सलग ड्युटी केल्यामुळे त्यांची साखर 550 पर्यंत वाढली. त्यामुळे त्यांच्या पायात क्रॅम्प आला त्यामुळे संबंधित व्यक्ती जो व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या पायातील क्रंप काढण्यासाठी मदत केली असे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातtraffic policeवाहतूक पोलीसbikeबाईकMONEYपैसा