दुकानाची तोडफोड करून साहित्य पळवणाऱ्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:03 IST2023-06-29T16:03:37+5:302023-06-29T16:03:51+5:30
एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून दोघे जण फरार

दुकानाची तोडफोड करून साहित्य पळवणाऱ्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले
हडपसर: फाट्यावरील एका मिठाईच्या दुकानातील साहित्याची काल सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तोडफोड केली. त्यानंतर मोटारसायकलवर पळून आरोपींचा पोलिसाने पाठलाग केला. सहा किमी अंतरावर आरोपींची मोटारसायकल घसरून ते खाली पडले. त्यातील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून दोघे जण फरार झाले आहेत.
हडपसरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी चैतन्य स्वीट अँड सेंटरमध्ये घुसून दुकानातील काचेची कपाटे व फ्रिजची लोखंडी कुऱ्हाडीने तोडफोड केली. रात्रपाळीवर असलेले पोलिस विजयकुमार ढाकणे हे शेवाळवाडी चौकात आले असताना ही घटना घडत होती. त्यांनी फोनवरून ही घटना पोलिस तिघांनी ठाण्यात कळविली. त्यानंतर त्यांनी मोटारसायकलवर पळून जाणाऱ्यांचा जाणाऱ्या पाठलाग केला. सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आरोपींची मोटारसायकल घसरून ते खाली पडले व ते उसाच्या शेतात पळून गेले.
पाठीमागून ढाकणे यांच्या मदतीला एक पोलिस पथक पोचले व त्यांनी उसात लपलेल्या एका १७ वर्षीय मुलाला गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह ताब्यात घेतले. दुसरा आरोपी गौरव संतोष अडसूळ (वय १९, रा. कॉलनी नंबर पाच, शेवाळवाडी) व एक अल्पवयीन मुलगा पळून गेला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.