शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

चक्क पोलिसांच्या नावे उकळत होते खंडणी, आयुक्तांनी असा रचला सापळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 10:35 AM

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून टोळी केली जेरबंद

पिंपरी(जि. पुणे)  : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या टोळीचा छडा खुद्द कृष्ण प्रकाश यांनी केला. कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचून खंडणी घेणाऱ्याला जेरबंद केले. निगडी येथे शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. 

रोशन संतोष बागूल, गायत्री रोशन बागूल (दोघेही, रा. सोनजाब, ता. दिंडोरी, जि. नाशिक, सध्या रा. देहूगाव), पूजा विलास माने (हडपसर, पुणे,) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. विन्सेन्ट अलेक्झंडर जोफेस (मोरे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी रविवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, तसेच त्यांचे बाॅस विश्वास नांगरे-पाटील हे ओळखीचे आहेत. आम्ही जमिनीचे मॅटर साॅल करतो. आम्ही पोलिसांची जमिनीची कामे केली आहेत, अशी बतावणी आरोपी रोशन बागूल याने केली. महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स असे लिहिलेले व महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेले बनावट ओळखपत्र तयार करून पोलीस दलाचा सदस्य असल्याचे भासवून सात हजार रुपये खंडणी गुगल पे वरून फसवणूक करून स्वीकारले. 

असा रचला सापळा...पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचला. फिर्यादीने आरोपी रोशन बागूल याला पैसे घेण्यास फोन करून निगडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. पाचशे रुपयांची चलनातील खरी नोट व त्याखाली पाचशे व दोन हजार रुपयांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा लावून एक लाख रुपयांचे बंडल तयार केले. आरोपी रोशन बागूल हाॅटेलमध्ये आला. त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश वेशांतर करून तेथे आले होते. आरोपी रोशन बागूल याने पैसे स्वीकारल्यानंतर त्याला पकडण्यात आले. मात्र, त्याचे दोन साथीदार पळून गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस