नाकतोंड कापडाने बांधून सुरक्षारक्षकाचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 15:06 IST2022-11-15T15:06:03+5:302022-11-15T15:06:11+5:30
हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

नाकतोंड कापडाने बांधून सुरक्षारक्षकाचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ
पुणे प्रतिनिधी/ किरण शिंदे: पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कंपनीच्या गोडाऊनमध्ये सुरक्षारक्षकाची काम करणाऱ्या व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. या व्यक्तीचे नाक आणि तोंड कापडाने करकचून बांधून ठार मारले आहे. 11 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला.
काशिनाथ कृष्णा महाजन (वय 55, रा. मूळ जळगाव) असे खून झालेल्या सूरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शंकर मुरलीधर बनकर (वय 42) यांनी तक्रार दिली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फुरसुंगी येथील मोनार्च कंपनीच्या गोडाऊन मध्ये काशिनाथ महाजन हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. दरम्यान आज सकाळी गोडाऊन परिसरातच काशिनाथ महाजन यांचा मृतदेह आढळला. त्यांचा श्वास गुदमरला जाईल या हेतूने अज्ञात आरोपीने त्यांच्या नाकातोंडाला कापडाने करकचून बांधून त्यांना ठार मारले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.