Video: आईला फेकून मारला लाकडाचा ओंडका; पेन्शन न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 17:59 IST2022-10-28T17:57:43+5:302022-10-28T17:59:32+5:30
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने गावात संतापाचे वातावरण

Video: आईला फेकून मारला लाकडाचा ओंडका; पेन्शन न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल
इंदापूर : थोरल्या मुलाने आईला अमानुष मारहाण केल्याची घटना पळसदेव गावात घडली आहे. स्वतः आईने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीचे ठोस कारण फिर्यादीत दिलेले नाही. मात्र आईचे पेन्शन लाटण्यासाठी मारहाण झाल्याची दबक्या आवाजात गावात चर्चा आहे.
दिलीप जाधव (रा.पळसदेव) असे आरोपीचे नाव आहे. वैजंयता जाधव (रा.पळसदेव) असे फिर्यादीचे नाव आहे. दि.२४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. आरोपी दिलीप जाधव याने शिवीगाळ,दमदाटी करुन डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारला अश्या आशयाची तक्रार दुस-या दिवशी फिर्यादीने दिली. त्यावरुन आरोपीच्या विरोधात इंदापूर पोलीसांनी भा. दं.वि.कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आईला फेकून मारला लाकडाचा ओंडका; पेन्शन न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल #Pune#crimepic.twitter.com/VIERIZCT9q
— Lokmat (@lokmat) October 28, 2022
मारहाण झाल्यानंतर फिर्यादीला चक्कर येवू लागल्याने तिला तिच्या धाकट्या मुलाने दि.२५ ऑक्टोबर रोजी इंदापूरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिला मारहाण का केली याची ठोस माहिती मिळाली नाही. मात्र आईला मिळणारी पेन्शन आरोपीस पाहिजे होती, त्यामुळे त्याने फिर्यादी आईला मारहाण केल्याची गावात चर्चा आहे.इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.