शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत महापौर आमच्या पक्षाचा होणार; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:57 IST

मनसेला सोबत घेण्याचा निर्णय माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार घेणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे. तर काही प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातंर्गत संषर्घ करावा लागणार आहे. अनेक प्रभागामध्ये खुली जागा एकच असल्यामुळे दिग्गज माजी नगरसेवकांना एकमेकांसमोर उभे राहवे लागणार आहे. आरक्षण सोडतीमुळे कोणत्या प्रभागामध्ये कोण उभे राहणार याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठींची ही डोकेदुखी वाढणार आहे. अशातच पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने महापौर आमचाच असल्याचा दावा केला आहे. तसेच पुण्यात सर्व प्रभागांत चांगले उमेदवार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

आगामी पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत. महायुतीच्या कुठल्या पक्षासोबत आमची युती होणार नाही, असे  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली आहे. आमची आघाडी महाविकास आघाडीसोबत होणार आहे. पुणे शहराचे महायुतीने वाटोळे केले. महायुतीच्या कुठल्याच पक्षासोबत युती करण्याचा आमचा विचार नाही. मनसेला सोबत घेण्याचा निर्णय माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार घेणार असल्याचे ते म्हणाले आहेत. कोल्हापूरमध्ये फक्त चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आमच्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा नाही. पुण्यात सर्व प्रभागांत चांगले उमेदवार मिळणार आहेत. आमच्याकडे पण लवकरच इनकमिंग होणार आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा महापौर होईल, असे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP (Sharad Pawar Group) claims Pune Mayor will be from their party.

Web Summary : NCP (Sharad Pawar Group) confidently asserts their party will secure Pune's mayoral position in upcoming elections. They plan to contest with Mahavikas Aghadi, rejecting alliances with Mahayuti. The party expects strong candidates in all wards, anticipating new members soon.
टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSharad Pawarशरद पवारElectionनिवडणूक 2024VotingमतदानMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती