पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 22:56 IST2025-06-30T22:54:13+5:302025-06-30T22:56:15+5:30
या दरम्यान सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला.

फोटो ओळ : पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत.
लोकमत न्यूज नेटवर्क बावडा : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरहून (दि. 30 जून ) निघाला व विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड,वकीलवस्ती, बावडा या गावाहून सायंकाळी इंदापूर ते सराटी 25 किमी प्रवास करून पुणे जिल्हातील शेवटच्या मुक्कामासाठी निरा नदी किनारी वसलेल्या सराटी (ता. इंदापूर जि.पुणे ) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत विसवला.
या दरम्यान सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला.
सराटी गावात पालखी सोहळा आल्यानंतर गावाच्या ईशीवर गावातील ग्रामस्थ रथातुन पालखी खांद्यावर घेऊन मुक्काम स्थळापर्यंत टाळ मृदुंगाच्या निनादांमध्ये आणल्यानंतर सर्व दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी, तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, पखवाजवादक, चोपदार टाळकरी तसेच पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,हनुमंत कोकाटे,उपसरपंच संतोष कोकाटे, सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी, काकासाहेब जगदाळे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, ज्ञानदेव कोकाटे,बापूसाहेब कोकाटे,विक्रम कोकाटे, रघुनाथ कोकाटे,बाबासाहेब कोकाटे, राजेंद्र कुरळे, सुरेश कोकाटे, अतुल भोसले,संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अध्यक्ष जालिंदर मोरे, सोहळा प्रमुख दिलीप मोरे, वैभव मोरे,गणेश मोरे, विश्वस्त विक्रम मोरे,नंदकुमार मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर, पुरुषोत्तम मोरे व इतर विश्वस्त,इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सराटी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी महाआरती संपन्न झाली.
सराटी येथे पालखी मुक्काम स्थळी थांबल्यानंतर नीरा नदीच्या किनारालगत असणाऱ्या गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.
पालखीच्या मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी जर्मन तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पाऊस वाऱ्यापासून भाविकांचे संरक्षण होणार आहे.
पालखी मुक्काम स्थळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आल्याचे दिसून येत आहे.